कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत  sakal
नाशिक

तीनशे कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मदत

येवल्यात अर्ज भरण्यासाठी शिवसेनेकडून वैद्यकीय कक्षातून मोफत मदत

सकाळ वृत्तसेवा

येवला : कोरोनाने तालुक्यातील थोडेथोडके नव्हे तर तीनशे जणांचे बळी घेतले आहेत. यातील अनेकावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांची होरपळ सुरू आहे. शासनाने अशा कुटुंबियांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. येथील अनेक नातेवाईक अर्ज भरत असून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत अर्ज भरून दिले जात आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक व मालेगाव पाठोपाठ येवल्यात रुग्णांची संख्या वाढली होती. यामुळे पहिली लाटच येवलेकरांसाठी तापदायक ठरली. अर्थात पहिल्या लाटेत बोटावर मोजण्या इतक्या जणांचे बळी गेले होते. मात्र दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला असून आतापर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागातील २३६ तर शहरातील ६४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यातील ज्येष्ठ होते त्यांच्या कुटुंबीयांचा आधारवड हरवले पण अनेक कुटुंबातील प्रमुख व कर्ते सदस्य या लाटेत हिरावले गेल्याने आजही या कुटुंबाला सदस्य जाण्याची होरपळ सहन करावी लागत आहे. अशा कुटुंबायासाठी शासनाने ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोविड आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीतकमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगइन करावे लागेल. तसेच https://epassmsdma.mahait.org/login.htm ही देखील लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल. केंद्र सरकारकडे कोविडमुळे मृत्यूची नोंद झालेली आहे,अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.

घटेंकडून विनामूल्य सहकार्य

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेट जमा होणार आहे. मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे अतुल घटे व राहुल लोणारी यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत मदत उपलब्ध केली आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात मयत रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन तसेच ऑनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. तालुका समन्वयक अतुल घटे व शहर समन्वयक राहुल लोणारी यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.या ठिकाणी अनेक जण येऊन ऑनलाईन अर्ज भरत आहेत.

अगोदरच नातेवाईकांची मोठी होरपळ झाली आहे. शासनाच्या या उपक्रमापासून नातेवाईक वंचित राहू नये यासाठी आम्ही अर्ज भरण्याचे सहकार्य करत आहोत. तालुक्‍यात सुमारे ३०० जण या मदतीसाठी पात्र ठरणार असून सर्वांचेच अर्ज भरले जातील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.

- अतुल घटे, तालुका समन्वयक, वैद्यकीय मदत कक्ष, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT