Pavan Malave esakal
नाशिक

Nashik News: शस्त्रकलेच्या प्रशिक्षणातून वारसा जतन; ते दांपत्य जपताहेत शिवकालीन युद्धनीती इतिहास

आनंद बोरा

नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रकलेचा वसा पवन माळवे जपत आहेत. या कामात त्यांची पत्नी कोमल याचाही सहभाग असतो. सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडिअममध्ये दोघे विद्यार्थांना शस्त्रकलेचे प्रशिक्षण देतात.

काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी- काठी आदींचे प्रशिक्षण दिले जाते. सहा ते चाळीस वर्षे वयोगटातील महिला, पुरुष सहभागी होतात.

दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत हे प्रशिक्षण चालते. प्रशिक्षणात युद्धकला, शस्त्र याचा इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र, ते कोणत्या धातूंनी बनवले जाते आदींची माहिती दिली जाते. (Heritage preserved through surgical training malave couple in CIDCO preserves war strategy history of chhatrapati shivaji maharaj time Nashik News)

प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शस्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यावर प्रशिक्षणार्थींना धार नसलेली तलवार, दांडपट्टा, काठी बंदिश, रुमाल बंदिश आदी शिकवले जाते.

पुण्याचे ‘फाइट मास्टर’ नितीन शेलार यांच्याकडून पवन यांनी दहा वर्षांपूर्वी युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यंत ते विद्यार्थांना ही कला शिकवतात. राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन ही त्यांची संस्था आहे.

कोमल या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देतात. सात ते पन्नास वर्षे वयोगटातील चाळीस जण त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. पवन हा पर्यटन विभागाचा अधिकृत गाइड आहे. पर्यटकांना नाशिकमधील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी दाखवतात.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

‘ट्रेकिंग ग्रुप’ला गड-किल्ल्यांचा इतिहास सांगून किल्ला कसा बघावा हे ते सांगतात. त्यांनी मोडी लिपीचे पायाभूत शिक्षण घेतले.

"प्रत्येक मुलाने शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. प्रशिक्षणासाठी शस्त्रे स्वतः बनवत असून त्यासाठी टाकावूतून टिकाऊचा प्रयोग करतो. नाशिकमध्ये गुरुकुल व्हावे असा माझा प्रयत्न आहे. व्यायामाचे प्रकार, युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन व्हावे हा त्या मागील उद्देश आहे." - पवन माळवे, प्रशिक्षक

"लग्न झाल्यानंतर पतींनी मला शस्त्रकलेचे प्रशिक्षण दिले. मी आता मुली आणि महिलांना ही कला शिकवत आहे. पूर्वीच्या काळात भरतनाट्यममधून युद्धकलेचे धडे दिले जात होते. भारताच्या या प्राचीन युद्ध कलेला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."

- कोमल माळवे, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT