टुडे १, मेन
----
लोगो : सकाळ स्कॅनिंग
----
(फोटो ठळक वापरावेत)
NSK26H35104 (या फोटोत मोजपट्टीच्या लाईनजवळ रेड ॲरो करून ५ फूट असा उल्लेख करावा)
जळगाव : महामार्गालगत नव्याने कॉंक्रिटीकरण केलेल्या सेवारस्त्याच्या बाजूला रस्त्यापेक्षा चार- पाच फूट उंच असलेली गटार.
------------
NSK26H35105 (या फोटोत मोजपट्टीच्या पाईपाच्या लाईनजवळ रेड ॲरो करून १ फूट असा उल्लेख करावा)
सेवारस्त्यावरील पाणी जाण्यासाठी गटारात टाकलेला पाइप सुमारे फूटभर उंच असल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचण्याची शक्यता आहे.
-----------
NSK26H35106
सेवारस्त्यावरच काही ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्यवस्थित होईल अशी रचना केली आहे.
-----
महामार्गालगतच्या सेवारस्त्यांचे सदोष कॉंक्रिटीकरण
उपशीर्षक
रस्त्यापेक्षा गटार उंचावर; पावसाळ्यात मार्गावरच साचणार ‘तलाव’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाले.. त्याची वर्ष, दोन वर्षातच वाट लागली.. त्यामुळे दोष दायित्व कालावधी संपण्याआधी महामार्गासह सेवारस्त्यांच्या मजबुतीकरणाची वेळ आली. मात्र, हे करत असताना होणारे कॉंक्रिटीकरण सदोष होत आहे. महामार्गालगत सेवारस्त्यांचेही कॉंक्रिटीकरण करण्यात येत असून त्याला लागून होणाऱ्या गटार रस्त्यापेक्षा उंच असल्याने आणि बहुतांश ठिकाणी या गटारांना रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपच न सोडल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात डबके साचणार आहे.
परिणामी, महामार्गाच्या मजबुतीकरणानंतरही जळगावकरांचा महामार्गावरून जातानाच त्रास कायम राहण्याचीच चिन्हे आहेत. ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित हे काम होतेय, या यंत्रणेचे या निकृष्ट आणि सदोष कामाकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येतेय.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. चौपदरीकरणाचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्यापासून चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत या कामात महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना समोर आला. शिवाय, कामही निकृष्ट दर्जाचे झाले. या महामार्गाच्या संपूर्ण कामाची रचनाच चुकीच्या अभियांत्रिकीचे उदाहरण ठरली. त्यामुळेच त्यावर दोष दायित्व कालावधी संपण्याआधी मजबुतीकरणाची वेळ आली.
१४-१
नव्याने कॉंक्रिटीकरणही सदोष
महामार्गाच्या मजबुतीकरणात काही दिवसांपासून प्रमुख रस्ता व सेवारस्त्यांचे कॉंक्रिटीकरण (व्हाइट टॉपिंग) केले जात आहे. मात्र, पूर्वीच्या कामासारखेच सदोष होत असून त्यासंबंधी नागरिकांच्या व तज्ज्ञांच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. सध्या एकलव्य क्रीडा संकुलानजीक महामार्गालगत सेवारस्त्याला लागून गटाचे काम सुरु आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या कामात अनेक त्रुटी आहेत. मुळातच अग्रवाल हॉस्पिटल चौकात पावसाळ्यात पाण्याचे डबके साचत होते. त्याच ठिकाणी हे काम होत असून मूळ रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणापेक्षा गटार उंचावर आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील पाणी गटाराच वाहून जाण्यासाठी गटाराला ठराविक अंतरावर अडीच इंचाच्या पाइपद्वारे होल सोडण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी हे होल सोडलेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहील.
गटाराचे वळण चुकीचे
आयटीआयसमोर सेवारस्त्याचे कॉंक्रिटीकरण व गटाराचे काम सुरू आहे. मात्र, याठिकाणी महामार्गावरून समांतर रस्त्यावर येण्यासाठी रस्ताच शिल्लक राहणार नाही, कारण मध्येच उंच गटार आहे. त्यामुळे आयटीआयसमोरून जाणारा समांतर रस्ता वाहनधारकांसाठी उपयोगाचा राहणार नाही. या रस्त्यावर आज ज्या पद्धतीने खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण आणि ठिय्या आहे तो कायमच राहील.
चौकट
महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
एकूणच, महामार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामातही महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी तांत्रिक दोष तसेच कायम ठेवले आहेत. हे काम सुरू असताना महामार्ग प्राधिकरण नावाच्या यंत्रणेचे अजिबातच लक्ष नाही, अशी स्थिती आहे. ज्या ठिकाणी काम चुकीचे किंवा सदोष होत असल्याचे आढळून येते, त्याठिकाणी ते दुरुस्त करण्याची तसदी ही यंत्रणा दाखवत नसल्याचे दिसते.
----------
या आढळल्या त्रुटी
- सेवारस्त्यापेक्षा गटार पाच फूट उंचावर
- रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही
- गटारांमध्ये पाणी जाण्यासाठी पाइप नाहीत
- काही ठिकाणी गटारांचे पाइप रस्त्यापेक्षा फूटभर उंच
- आयटीआयसमोर समांतर रस्त्यावर जाण्याची सुविधा नाही
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.