नाशिक

निकम फार्मसीत कार्यक्रम

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H32225 गोंदूर : प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीत एड्स जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नीता खलाणे. निकम फार्मसी कॉलेजमध्ये एड्स जनजागृती कार्यक्रम --- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई) आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (जिल्हा रुग्णालय, धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदूर (ता. धुळे) येथील प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही/ एड्स जनजागृती व संवेदनशीलता कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात एसीपीएम मेडिकल कॉलेजच्या समुपदेशक नीता खलाणे प्रमुख मार्गदर्शक होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/ एड्सविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना संसर्गाची कारणे, प्रसाराचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय तसेच या आजाराविषयी समाजात असलेले गैरसमज व त्यामागील सत्य यावर प्रकाश टाकला. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्याप्रती सामाजिक संवेदनशीलता जोपासण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी याविषयीची योग्य माहिती आत्मसात करून एक सुजाण नागरिक म्हणून समाजात जनजागृती करावी, असे प्रतिपादन केले. युवकांमध्ये आरोग्यविषयक जाणीवजागृती निर्माण करणे, एचआयव्ही/एड्सबाबतचे गैरसमज दूर करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत योग्य दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या अभ्यासपूर्ण सत्रामुळे विद्यार्थ्यांना महत्त्वाची व जीवनोपयोगी आरोग्यविषयक माहिती मिळाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव शुभांगी निकम, उपाध्यक्ष रोहित निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सागर जाधव, प्राचार्य डॉ. जसवंत लांबले, विभागप्रमुख डॉ. संदीप रावंदळे, प्रा. प्रज्ञा मोरे आणि प्रा. अतिश साळुंके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT