Holi 2023  esakal
नाशिक

Holi 2023 : होळीसाठी शेणाच्या चाकोल्या झाल्या इतिहासजमा

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : आदिवासी भागात प्रत्येक सण आणि त्या सणाची परंपरा जोपासली जाते. मात्र काळ कितीही बदलला तरीही परंपरा जोपासली जाते. त्यातच होळी आदीवासींसाठी दिवाळीपेक्षा जास्त आनंद देणारा असतो. त्यामुळे होळी सलग दोन चार दिवस होते. त्यातच होळी आणि धुळवड या सणांमध्ये जसे रंगाशी नाते आहे, तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे.

काही वर्षापूर्वी होळी जवळ आली, की घरोघरी शेणाच्या चाकोल्या दिसायच्या. पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहितही नाही. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची होळी आणि आजची होळी यात बराच फरक पडला आहे. होळी लाकडांची असली तरीही घरोघरी तयार केलेला शेणाच्या चाकोल्या होळीच्या पूजेच्या वेळी टाकल्या जायचच्या.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

लहान मुले दोन दिवसआधीच या चाकोल्या बनवायचे. त्यांनी बनविलेल्या लहान लहान चाकोल्या माळेत ओवता यावे यासाठी मध्यभागी एक भोकही ठेवले जायचे. त्या पूर्णपणे सुकल्या की त्याची माळ बनवली जायची. आई-बहिणीसोबत लहान मुलं होळीच्या पूजेला जायचे. त्या वेळी या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. आजही या चाकोल्यांचा वापर पूजेसाठी होतो. शेणापासून चाकोल्या करण्याचा आनंद नव्या पिढीला कळणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहे.

''आता प्रत्येक सणाला आधुनिकतेचा साज दिला जातो. मात्र आदिवासी भागात आजही काही सणांना पारंपरिकतेशिवाय साजरा केल्यास आनंद मिळत नाही. त्यामुळे आपलेच सण, उत्सव, परंपरा यांची आपणच जाणीव ठेवणे काळाची गरज आहे.'' - अतुल आहिरे, पर्यावरण मंडळ सदस्य, इगतपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT