नाशिक

सप्तशृंगी गडावर कर्तव्य बजावताना होमगार्डचा मृत्यू ​चक्कर येऊन पडल्याने डोक्याला दुखापत; उपचारादरम्यान नाशिक येथे निधन

CD
13294 गुलाब देशमुख ------------- सप्तशृंगी गडावर होमगार्डला दुखापत; उपचारादरम्यान नाशिकला मृत्यू सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २१ : सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सातबाभळ (ता. सुरगाणा) येथील होमगार्डचा (गृहरक्षक दल) रूग्णालया उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुलाब नारायण देशमुख (वय ४७) असे मृत होमगार्डचे नाव आहे. सुरगाणा होमगार्ड पथकातील गुलाब देशमुख (सनद क्रमांक २०८२८१) हे गेल्या आठ ऑक्टोबरपासून सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव यात्रा बंदोबस्तासाठी तैनात होते. गडावरील पायऱ्यांजवळील बारी क्रमांक १० येथे त्यांची दिवसा ड्युटी होती. १७ ऑक्टोबरला रात्री आठला त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते ‘ट्रस्ट भक्त निवास’ येथे विश्रांतीसाठी गेले होते. रात्री ११:४५ ला ते लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यानंतर सोबतच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना तातडीने श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नाशिक येथील ‘बिरसा मुंडा व जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१९) मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT