नाशिक

‘संवेदना दिवाळी’त होम मिनिस्टरच्या‘संवेदना दिवाळी’त होम मिनिस्टरच्या

CD
(बातमी आजच घ्यावी) NSK26H34848 निंभोरा (ता.रावेर) : संवेदना दिवाळी कार्यक्रमाच्या उद् घाटनप्रसंगी आमदार नंदकिशोर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवती अध्यक्षा भाग्यश्री ठाकरे, विवेक ठाकरे आदी. ------- ‘संवेदना दिवाळी’त होम मिनिस्टरची धमाल -- राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा उपक्रम; निंभोऱ्यात तीन महिला ठरल्या विजेत्या सकाळ वृत्तसेवा निंभोरा (ता.रावेर), ता.१२ : सध्यास्थितीत दुष्काळाच्या चिंतेने ग्रासलेल्या शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी कुटुंबांना दिवाळीच्या आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यावरील मानसिक ताण हलका होऊन त्यांना सहकुटुंब तणावमुक्त वातावरणात सणाचा आनंद लुटता यावा, यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘यंदाची दिवाळी : माणुसकीची दिवाळी-संवेदना दिवाळी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला निंभोरा येथील आठवडे बाजार चौकात झालेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यात तीन महिला विजेत्या ठरल्या. आमदार नंदकिशोर महाजन अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे उद् घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा विभागाच्या जिल्हाध्यक्षा तथा निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका भाग्यश्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. रावेरचे उपनगराध्यक्ष आसिफ दारा शेख, जळगावच्या नगरसेविका वैशाली पाटील, सावद्याच्या नगरसेविका रेखा वानखेडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष कुर्बान शेख, भोरगाव लेवा पंचायतीच्या संचालिका प्रमिला खाचणे, रावेर पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती प्रल्हाद बोंडे, विवरा येथील माजी सरपंच वासुदेव नरवाडे आदी यावेळी उपस्थित होते. ‘होम मिनिस्टर’चे संयोजक शुभम म्हस्के (पुणे) यांनी कौशल्यपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. कमल पवार (वय ९०), गुंफाबाई बोंडे (७५), दीड महिन्याच्या बाळासह धनश्री राणे आदी महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी ६४ महिलांना निंभोरा गाव सेवा समितीतर्फे सेमी पैठणी भेट देण्यात आली. यात प्रथम बक्षीस(एलईडी टीव्ही) सोनाली कोळंबे यांनी, द्वितीय (मिक्सर ग्राइंडर) जागृती सोनवणे व तृतीय (कुकवेअर सेट) बक्षीस शीतल प्रदीप तायडे यांनी जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT