नाशिक

वरणगाव गोळीबार प्रकरण

CD
NSK26H34522 जळगाव : गुन्हे शाखेने अटक केलले संशयितांबरोबर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित व पथक. --- वरणगाव गोळीबार प्रकरण (लोगो) --- इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने ‘हनीट्रॅप’ --- अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट; दोघे स्थानिक गुन्हेशाखेच्या जाळ्यात सकाळ वृत्तसेवा जळगाव/भुसावळ, ता. ४ : मुक्ताईनगर तालुक्यातील एका तरुणाला इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून ''हनीट्रॅप''द्वारे वरणगाव येथे बोलाविले. तर दोघांनी त्याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून, जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे दोघांनी पोलिसांकडे कबूल केले आहे. मुक्ताईनगरात काझीपुऱ्यातील सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४) याला रविवारी (ता. १) सायंकाळी @ashwi_ni2083 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मेसेज व कॉल करून वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर भेटण्यासाठी बोलावले. सरफराज तेथे पोहोचताच इस्टाग्रामवरील ती मुलगी आली नाही. मात्र, त्याच्या पाळतीवर असलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर व पायावर लोखंडी रॅाडने हल्ला करून गंभीर जखमी केले, तसेच त्यांनी गावठी कट्ट्यातून २ राऊंड गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला व पळून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे व सायबर सेलच्या पथकाने अवघ्या ४५ मिनिटांत डिलिट केलेले इन्स्टाग्राम खाते व संशयितांचा माग काढला. स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांची माहिती संकलित केली. त्यावरून संशयित भूषण ऊर्फ बिसला राजू सावळे (वय २०, रा. फेकरी, ता. भुसावळ), सिद्धार्थ रामदास ढिवरे (२७, ग्रामपंचायत सब-ठेकेदार, रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना अटक करून वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मृत्यूपूर्वी मित्राने दिली पिस्तूल गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल संशयिताचा साथीदार सागर कहर (रा. भुसावळ) याने अपघातात मरण पावण्यापूर्वी भूषणला दिल्याचे निष्पन्न झाले असून, मृत सागर कहर याच्यावरही भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT