honor of firta naral week goes to Sinnarkar this year nashik news esakal
नाशिक

Nashik News : फिरत्या नारळी सप्ताहाचा मान यंदा सिन्नरकरांना; 'तयारीला लागा' चे आदेश

जागतिक कीर्तिमान स्थापित केलेला सरला बेट येथील सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम फिरत्या नारळी सप्ताहाचा यंदाचा बहुमान सिन्नरकरांना मिळणार आहे.

अजित देसाई

सिन्नर : अनेक जागतिक कीर्तिमान स्थापित केलेला सरला बेट येथील सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम फिरत्या नारळी सप्ताहाचा यंदाचा बहुमान सिन्नरकरांना मिळणार आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी सिन्नर तालुक्यातील चाळीस गावातील शेकडो ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सरला बेट येथे सद्गुरु रामगिरी महाराज यांची भेट घेतली असता त्यांनी सिन्नरकरांना तयारीला लागा असा आदेश दिला. (honor of firta naral week goes to Sinnarkar this year nashik news)

गंगागिरी महाराजांच्या नारळी सप्ताहाचे यंदाचे 177 वी वर्ष आहे. या सप्ताहाचे यजमानपद सिन्नरला मिळावे यासाठी पंचाळे येथील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून आग्रही होते. या काळात सरला बेटावरील विविध कार्यक्रमांमध्ये तसेच सद्गुरु रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या परिसरातील कार्यक्रमांमध्ये या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत होता. गेल्या वर्षी मलढोन येथे झालेल्या कार्यक्रमात सद्गुरु रामगिरी महाराज यांनी अनुकूलता दर्शवली होती.

मकर संक्रांतीच्या दिवशी सरला बेट येथील कार्यक्रमात सिन्नरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत 177 व्या नारळी सप्ताहाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करून घेतले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे, एड. राजेंद्र चव्हाणके, अरुण वाघ, भारत कोकाटे, संभाजी जाधव, अरुण येवले, मच्छिंद्र चिने, सुभाष महाराज गेठे , शिवाजी महाराज तळेकर, किशोर महाराज खरात, अरुण थोरात, कैलास थोरात, शिवाजी केरे आदी यावेळी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यास आजपर्यंत केवळ दोन वेळा नारळी सप्ताहाचा बहुमत मिळाला आहे. यावेळीची संधी देखिल नाशिककर म्हणून आम्हाला मिळावी. आयोजनात आम्ही कुठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. तर दुष्काळी असलो तरी अध्यात्म आणि सांस्कृतिक अधिष्ठानाच्या बाबतीत सिन्नरकर नेहमीच पुढे राहिले आहेत. सप्ताहाचा कार्यक्रम परंपरेला साजेसा असाच होईल असे सीमंतिनी कोकाटे यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून सिन्नरकरांची असणारी तळमळ बघता सप्ताहाचा कार्यक्रम चांगलाच होईल. तुमच्या इच्छेनुसार यावेळचा सोहळा सिन्नर मध्ये होईल तेव्हा आजपासूनच तयारीला लागा असा आदेश रामगिरी महाराज यांनी दिला. सरला बेट येथील नियोजन समिती पंचाळे गावात येऊन जागेबाबतची पाहणी करतील असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी ते द्वादशी या कालावधीत गंगागिरी महाराज नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सरला बेट संस्थानच्या परंपरेनुसार आषाढी वद्य एकादशीला पुणतांबा येथील यात्रेत यजमान गावाला अधिकृत नारळ देण्यात येतो. यानंतर केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असतो.

त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी रामगिरी महाराज नियोजित सप्ताहाच्या आयोजन स्थळाबाबत घोषणा करत असतात. या सप्ताहासाठी पंचाळे गावाच्या शिवारातील सुमारे शंभर एकर जागा निश्चित करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील सर्व गावे तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना या नियोजनात सहभागी करून घेतले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT