नाशिक

कर्करोगाशी लढा देणाऱ्यांचा गौरव

CD
कर्करोगाशी लढा देणाऱ्या २५० जणांचा गौरव विजेता उपक्रमातून मिळाली जगण्याची नवी उमेद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : कर्करोगावरील उपचारांपलीकडे जाऊन रुग्णांचे पुनर्वसन, भावनिक आधार आणि उत्तम जीवनमान मिळवून देणारी सर्वसमावेशक आधारव्यवस्था उभारण्याचा संकल्प होप-एमओसी कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने केला आहे. शनिवारी (ता.३१) आयोजित ‘विजेता कर्करोगाविरुद्ध खंबीर मन’ या विशेष उपक्रमात २५० हून अधिक कर्करोगमुक्त रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचा गौरव करण्यात आला. कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तींच्या जिद्दीचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रवासात मोलाची साथ देणाऱ्या कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी स्वतः कर्करोगाशी लढा देणाऱ्या अभिनेत्री मेधा मांजरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीने उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा मिळाली. उपचारांनंतर नव्याने आयुष्य जगण्याची उमेद आणि या प्रवासातील अनुभव यावेळी कथन करण्यात आले. २०२६ मध्ये एमओसी कर्करोग उपचार केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजेता’ उपक्रमाचे हे चौथे पुष्प होते. यापूर्वी मुंबई, पुणे, अहमदाबाद येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. सोनल धांडे उपस्थित होते. डॉ. पेठे यांनी, कर्करोग उपचारांचा खरा उद्देश केवळ औषधोपचार नसून रुग्णांना अधिक काळ आणि आयुष्य जगण्यास मदत करणे हा आहे. भारतात कर्करोगाचा आर्थिक व मानसिक भार मोठा असल्याने वेळेवर निदान महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले. भविष्यात कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अधिक संघटित स्वरूपातील आधारव्यवस्था विकसित करण्याचा संस्थेचा मानस असून हा उपक्रम कर्करोगाचे निदान हा आयुष्यातील एक टप्पा असला, तरी त्यावरून संपूर्ण आयुष्याची व्याख्या होत नसल्याचा संदेश देतो. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

WTC Final 2027: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणार का? बांगलादेशच्या पराभवाचा टीम इंडियाला काय फायदा

‘स्माइल डे’निमित्त इस्रायलच्या वाणिज्यदूतांचं खास आवाहन; कॅप्टन स्मित मच्छारांचाही उल्लेख

IND vs NZ, 5th T20I: आऊट की सिक्स? इशान किशनचा शॉट अन् ऍलेनची भन्नाट फिल्डिंग, पण थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT