फोटो -NSK26H31269
नाशिक : दिल दोस्ती फाउंडेशनतर्फे हृदयरोगदिनी गौरविण्यात आलेले हृदयरोगतज्ज्ञ.
दिल दोस्ती फाउंडेशनतर्फे
हृदयरोग तज्ज्ञांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : जागतिक हृदयरोग दिनानिमित्त दिल दोस्ती फाउंडेशनच्या वतीने हृदयरोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा हृदयरोग तज्ज्ञांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा पलाश हॉल येथे शुक्रवारी (ता.२) हा कार्यक्रम झाला.
हृदयविकाराच्या क्षेत्रातील समर्पित सेवा आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. संतोष वडिले, डॉ. विद्युत सिन्हा, डॉ. सत्यजित आहेर, डॉ. तुषार पाटील, डॉ. राहुल शेवाळे आणि डॉ. हृषीकेश देसले यांचा प्रमुख पाहुणे ॲड. अनिल वैद्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. फाउंडेशनच्या संचालिका मृणाल सांगळे यांनी संस्थेच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. गरजू रुग्णांना मदत, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध सामाजिक घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. आरोग्यसंपदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप सेंटरच्या संचालिका डॉ. पल्लवी पुरकर यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व, आधुनिक तपासणी सुविधा आणि आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्याचे फायदे विशद केले.
या वेळी संस्थेचे संचालक डॉ. नीलेश पुरकर, डॉ. नितीन ठाकरे, सौरभ शिरोडे, तसेच डॉ. प्रवीण गांगुर्डे, डॉ. दिनेश महाजन, डॉ. समीर आहिरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते. हृदय आरोग्याविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यासह हृदयरोग तज्ज्ञांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.