नाशिक

विषमता अन अन्यायाविरोधात संघटित लढ्याची गरज : भगवान चित्ते येवल्यात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी

CD
पान तीन ----------------- 27548 येवला : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती कार्यक्रमात अभिवादन करताना समाजबांधव. विषमता अन अन्यायाविरोधात संघटित लढ्याची गरज भगवान चित्ते : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंना अभिवादन सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१७ : आजही दलितांवरील अत्याचार आणि हत्याकांडाच्या घटना घडत असून, दुसरीकडे अन्यायाविरोधात लढणाऱ्या सामाजिक चळवळी क्षीण होत आहेत. समाजातील विषमता आणि अन्यायाविरोधात पुन्हा एकदा संघटित लढ्याची गरज असल्याचे प्रतिपादन भगवान चित्ते यांनी केले. येथील अण्णा भाऊ साठे स्मारकात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड चित्ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चित्ते यांनी, लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक योगदानाचा उल्लेख केला. लहुजी वस्ताद यांची नात मुक्ता साळवे या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दलित विद्यार्थिनींपैकी एक होत्या. त्यांनी त्या काळात ‘आम्ही धर्म नसलेली माणसे’ या निबंधातून तत्कालीन समाजव्यवस्थेला परखड प्रश्न विचारत सामाजिक विषमतेवर भाष्य केले होते, असे चित्ते यांनी सांगितले. नितीन संसारे, जितेंद्र गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ऑल इंडिया पँथर सेनेचे संदीप पगारे, मुकुंद साठे, सचिन खैरनार, दीपक गायकवाड, रावसाहेब नागरे, विशाल शेलार, प्रवीण अहिरे, किरण अहिरे, मनोज हिवाळे, आकाश साठे, तुषार खैरनार, संजय खाजेकर, संदीप खळे, लवकुश साठे आदीं उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT