Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : घोड्याला विष देऊन मारले; एकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : घोड्यास विषारी पदार्थ खाऊ घालून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकाळी परिसरात सुलताना शेख यांच्या मालकीचा तबेला आहे.

त्यांच्याकडे पाच घोडे होते. त्यापैकी चार घोड्यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यावेळेस मृत्यूचे गांभीर्य कळले नाही. (Horse poisoned and killed case registered against one Nashik Crime News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पाचव्या घोड्याच्या मृत्यूने त्यांना संशय आला. २८ मार्चला सकाळी तबेल्यातील कामगार घोड्यास चारा टाकण्यासाठी गेला. घोडा मृतावस्थेत आढळून आला. संशय आल्याने त्यांनी गुरांच्या दवाखान्यात घोड्याची तपासणी केली. शवविच्छेदन केले.

घोड्यास विष देण्यात आल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. पुढील तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. सुलताना यांची घोड्यास विष दिल्याची खात्री झाल्याने त्यांनी बुधवारी (ता.१२) दुपारी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने प्रकार केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. अशा घटनेचा गुन्हा दाखल होण्याची शहर पोलिस आयुक्तालयातील पहिली घटना असल्याच्या चर्चेस पोलिस ठाण्यात उधाण आला होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT