Hospital esakal
नाशिक

Nashik News : पथकाच्या तपासणीत रुग्णालयातील कर्मचारी गैरहजर!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील रुग्णालये तसेच विभागीय कार्यालयांमध्ये पाच पथकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणी मध्ये २८ कर्मचारी गैरहजर आढळून आले. (Hospital staff absent in team inspection Nashik News)

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी नसल्याने कामावर हजर राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांना तपासणीच्या सूचना दिल्या.

मागील दोन दिवसात १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करण्यात आली. गुरुवारी (ता.१८) पुन्हा पाच पथकांच्या माध्यमातून तपासणी कण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयात तपासणी केली असता, १२ कर्मचारी गायब आढळून आले. बिटको रुग्णालयातही दोन कर्मचारी गैरहजर आढळून आले. तर प्रशासन उपायुक्त घोडे-पाटील यांनी पश्चिम विभागीय कार्यालयात अचानक तपासणी केली असता, पाच कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत.

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील तीन पथकांनी तीन रुग्णालयांना भेटी दिल्यानंतर नऊ कर्मचारी गैर हजर आढळले. गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनात कपात केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT