Police Arrest esakal
नाशिक

कामगारानेच मारला हॉटेलच्या पैश्यांवर डल्ला; पोलिसांनी 3 तासात लावला छडा

विनोद बेदरकर

नाशिक : पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या एक लाख रुपये चोरीचा अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या तीन तासांत शोध लावून रोकड जप्त केली. हॉटेल शिवसागरमधील दुसऱ्या मजल्यावरील किचनमधून एक लाख रुपयांची चोरी झाली होती.

कामगारानेच मारला डल्ला

चोरी झाल्याचे लक्षात येताच हॉटेलचे व्यवस्थापक अमित अशोक गद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रभारी निरीक्षक नंदन बगाडे, निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, किरण गायकवाड, अनिरुद्ध येवले, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, योगेश शिरसाट, मुकेश गांगुर्डे, तुळशीराम जाधव, प्रशांत नागरे आदींच्या पथकाने हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून हॉटेलमधील कामगार धनबहादूर छकबहादूर सारू (२२) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी. त्याच्या बॅगेत एक लाख रुपये मिळून आले. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा शोध लावला. याप्रकरणी संशयितास १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT