Crowd Sakal
नाशिक

लॉकडाउनच्या घोषणेनंतर नाशिककरांची बाजारपेठेत तोबा गर्दी; पाहा VIDEO

जिल्ह्यात उद्यापासून (दि. १२) बारा दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

अरुण मलानी

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने उद्या (ता.१२) पासून दहा दिवसांकरीता कठोर निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभुमीवर मंगळवारी (ता.१२) शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरीय भागांमध्ये खरेदीसाठी नाशिककरांनी तोबा गर्दी केली होती. दुकानांपुढे लागलेल्‍या रांगा, रस्‍त्‍यांवर वाहनांच्‍या गर्दी असे पोटात गोळा आणणारे दृष्य अनुभवायला मिळाले. (Huge crowd of citizens in the market in Nashik after the announcement of lockdown)

ब्रेक द चेनअंतर्गत यापूर्वीच विविध निर्बंध लागू केलेले आहेत. त्‍यातच नाशिकमध्ये कोरोनाचा फैलाव आटोक्‍यात आणण्याच्‍या दृष्टीने जिल्‍हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केलेत. उद्या (ता.१२) पासून अमलबजावणीला सुरवात होणार असल्‍याने मंगळवारी सकाळपासून नाशिककरांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात प्रामुख्याने रविवार कारंजा व सभोवतालच्‍या परीसरातील किराणा व्‍यावसायिकांच्‍या दुकानाबाहेर लांब रांगा लागल्‍या होत्‍या. भाजी बाजारांमध्येही तुडूंब गर्दी बघायला मिळत होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील परीस्‍थितीप्रमाणे उपनगरीय भागांमध्ये सारखीच परीस्‍थिती होती.

Crowd at market

गर्दी करणारे ठरणार सुपर स्‍प्रेडर्स…

बऱ्याच ठिकाणी गर्दीत शारीरीक अंतर (सोशल डिस्‍टंसिंग)चा फज्‍जा उडाला होता. अनेकांनी मास्‍कचा व्‍यवस्‍थितरित्‍या वापर केलेला नव्‍हता. अशात खरेदीसाठी गर्दी करणारे येत्‍या काळात कोरोनाचे सुपर स्‍प्रेडर्स ठरतात की काय अशी भिती व्‍यक्‍त होते आहे.

(Huge crowd of citizens in the market in Nashik after the announcement of lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT