Real Estate esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगाव बसवंत परिसरात रिअल इस्टेटची उत्तुंग झेप!

येथील दुय्यम निंबधक कार्यालयात २०२२ च्या तुलनेत मागील वर्षाच्या मुद्राक शुल्क व नोंदणी करात तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : महामार्गामुळे दळण वळणाला सुलभ व्यवस्था, तीन तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण, बागायती शेती, व्यापारी पेठ यामुळे पिंपळगाव बसवंत शहराला सर्वाधाने झळाळी मिळत आहे.

बडे व्यापारी, उद्योगपतींनी पिंपळगाव शहरात पाय ठेवले आहेत. ‘श्रीमंतीची झालर अन्‌ रोजगारांची संधी’ असलेल्या पिंपळगाव शहरात आपल्या स्वप्नातील घर, बंगला असावा, हे प्रत्येकाची इच्छा आहे.

यातून पिंपळगाव शहरातील रिअल इस्टेटने मागील वर्षी उत्तुंग झेप घेतली आहे. येथील दुय्यम निंबधक कार्यालयात २०२२ च्या तुलनेत मागील वर्षाच्या मुद्राक शुल्क व नोंदणी करात तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय दस्ताऐवज नोंदणीमध्ये सहाशेने वाढ नोंदविली आहे. (Huge leap of real estate in Pimpalgaon Baswant area Nashik News)

तीन वर्षांपूर्वी कोविडच्या प्रादुर्भावात सर्वांधीक झळ बसली रिअल इस्टेट क्षेत्राला. बांधकाम व्यवसायिकांना यात मोठे नुकसान झेलावे लागले. बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर मंदीची कुऱ्हाड कोसळली.

सध्या ही मरगळ झटकल्याचे चित्र असून, बांधकाम क्षेत्राला मोठा बुस्ट मिळाला आहे. प्लॅट, रो-हाऊस, अशा सदनिकासह प्लॉटच्या दरात मोठी तेजी आली आहे.

दरात उसळी येऊनही खरेदी-विक्रीचा आलेख चढताच आहे. रिअल इस्टेट क्षेत्राने घेतलेली नव्याने उभारी पिंपळगाव शहराच्या प्रगतीचे शुभ संकेत आहेत.

रिअल इस्टेटची गाडी रूळावर येऊन बुलेट ट्रेनचा वेग घेतल्याचे दिसत आहे. सिमेंट,वाळू, स्टिल, मजुरीचे दर वधारत असल्याने सदनिकांचे दरही उसळी घेत आहेत. नोकरदार वर्ग खरेदीसाठी पुढे येत आहे.

येथील दुय्यम निंबधक कार्यालयात खरेदी-विक्रीसाठी सातत्याने वर्दळ दिसते. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या महसुलात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पिंपळगाव दुय्यम निंबधक कार्यालय

महिना व वर्षे दस्तसंख्या मुद्रांक व नोंदणी फी

जानेवारी ते डिसेंबर २०२२ ३१६९ १८ कोटी ९७ लाख ४६ हजार रुपये

जानेवारी ते डिसेंबर २०२३ ३७९२ २१ कोटी ४१ लाख ४० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT