Malegaon S. A. Attarwala shop crowded to buy perfumes and perfumes esakal
नाशिक

Nashik News: मालेगावी अत्तरविक्रीला उदंड प्रतिसाद! एस. ए. अत्तरवाला दालनात ग्राहकांची खरेदीची धूम

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : दीपोत्सवानिमित्त शहरातील कॅम्प-संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागात लक्षणीय उलाढाल झाली. मुस्लीम बहुल असलेल्या पूर्व भागात देखील अत्तर व परफ्युम खरेदीसाठी तरुणाईने गर्दी केली होती.

येथील मुल्लाबाडा भागातील एस. ए. अत्तरवाला यांच्या दालनात ग्राहकांची अजूनही गर्दी आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी सुगंधित अत्तर व परफ्युमवर भरगोस सूट दिली आहे.

शहरासह कसमादे परिसरातील ग्राहकांकडून एस. ए. अत्तरवाला यांच्या दुकानातील खरेदीला पसंती मिळत आहे. (Huge response to malegaon perfume sale S A Attarwala Shopping spree of customers in shop Nashik News)

मालेगावात अत्तर विक्रीची शेकडो दुकाने आहेत. एस. ए. अत्तरवाला यांच्या दालनात सुगंधीत अत्तर विक्रीची सेवा ७१ वर्षापासून अविरतपणे सुरु आहे. ग्राहकांचा विश्‍वास संपादन केल्याने एस. ए. अत्तरवाला हे दालन आघाडीवर आहे.

विशेषत: दिवाळी व इतर सणासुदीला ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या संख्येने अत्तर खरेदीसाठी त्यांच्या दुकानात हजेरी लावतात. यावर्षी दिवाळीत विविध कंपन्यांचे दर्जेदार सुगंधित अत्तर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती.

शनाया, टाटॅनियम, वजूद, सिग्नेचर, दिरहम, गोल्डन, रॉयल या ब्रॅन्डेड अत्तरवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. चारमीन, आफ्रिन, सिस्टाब्रीज, फ्रेश या रुम स्प्रे आदींवर भरघोस सूट मिळत आहे.

बॉडी स्प्रेमध्ये एकावर एक फ्री अशी स्कीम असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हॅसलीन २० ते १२० रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अत्तर, व्हॅसलीन, स्प्रे आदी सर्वच प्रकारच्या वस्तू दर्जेदार असतात. दिवाळी सणात सर्व स्तरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एस. ए. अत्तरवाला दालनाचे मोमीन सुलेमान अब्दुल्ला यांनी सांगितले.

"गेल्या सात दशकापासून दुकान ग्राहकांच्या सेवेत आहे. बाजारभावापेक्षा येथे अत्तर व परफ्युम येथे कमी किमतीत आम्ही विकतो. कमी नफ्यात ग्राहकांची मने जिंकली आहेत. आमच्या येथे व्हॅसलीन ब्रॅन्डेड आहे. येथे वर्षभर विविध वस्तूंवर सूट दिली जाते. कसमादे परिसरातील ग्राहकांनी येथे अवश्‍य भेट द्यावी."

- खिजीर अब्दुल्ला, संचालक, एस. ए. अत्तरवाला, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT