नाशिकमध्ये डेंगीचे रुग्ण वाढले  Google
नाशिक

नाशिकमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच डेंगीचे शेकडो रुग्ण

विक्रांत मते

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचा संभावित धोक्याची तयारी करत असतानाच शहरात डेंगी व चिकूनगुनियाने तोंड वर काढले आहे. ऑगस्ट महिन्याच्या दहा दिवसात १०६ तर चिकूनगुनियाचे ७८ रुग्ण आढळले आहेत.

जानेवारी ते मे या कालावधीमध्ये शहरात डेंगीचे ४१ रुग्ण होते. जून महिन्यात चाळीस रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात १८५ नवे रुग्ण, तर ऑगस्ट महिन्याच्या दहा दिवसात १०६ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डेंगीच्या रुग्णांची संख्या ३७२ वर पोहोचली आहे. जून महिन्यात चिकूनगुनियाचे ८५ रुग्ण होते. जुलै महिन्यात १४८ रुग्ण आढळून आले. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसात ७८ रुग्ण आढळल्याने ३११ रुग्णसंख्या झाली आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पावसाळ्यात डबक्यांमध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यात होत असलेली डासांची पैदास डेंगी, चिकूनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढविणारी ठरत असल्याने औषध फवारणीची आवश्‍यकता आहे, परंतु जंतूनाशक, धूर फवारणी होत नसल्याने ठेकेदारांना पोसण्याचे काम होत आहे. शहरात सिडको, सातपूर भागात अधिक रुग्ण असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अहवालात दिसून येत आहे.

बाधितांचीही होणार आरटी- पीसीआर

डेंगी, चिकूनगुनिया व कोरोना बाधितांमध्ये समान लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे रक्त नमुने घेताना रुग्णांची आरटी- पीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT