Murder News
Murder News esakal
नाशिक

Crime Update : वडाळा गावात पत्नीकडून पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वडाळा गावातील माळी गल्ली- कोळीवाडा परिसरातील खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात कुजलेल्या अवस्थेतील इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी (ता. २४) रात्री उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संशयित पत्नीने पतीचा खून करून घराला कुलूप लावून पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.(Husband killed by wife in Wadala village Nashik Latest Crime News )

दिलीप रंगनाथ कदम (वय ५४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील माळी गल्लीत कदम हे पत्नीसमवेत राहत होते. त्यांचा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून वेगळा राहत होता. शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा भाऊ व मुलगा घरी आले असता, दाराला कुलूप होते.

त्यामुळे त्यांनी कुलूप तोडून आत गेले असता, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आणि रक्ताच्या थारोळ्यात दिलीप कदम हे मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस घटनास्थळी फौजफाटासह दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी कदम यांचा मुलाच्या फिर्यादीनुसार रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT