नाशिक

पत्नीवर ब्लेडने वार; पतीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

CD
पत्नीवर ब्लेडने वार; पतीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : पंचवटीतील कुसुमाग्रज उद्यानात मोबाईल देण्याच्या बहाण्याने पत्नीला बोलावून जीवे मारण्याच्या उदेदशाने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करणाऱ्या आरोपी पतीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पीडित पत्नीला एक लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. राजू पोपट मते (रा. शिंदेनगर, पेठरोड) असे आरोपीचे नाव आहे. ६ फेब्रुवारी २०१७ ला ही घटना घडली. आरोपी राजूची पत्नी ही माहेरी राहत असताना आरोपीने संगनमत करून तिला कुसुमाग्रज उद्यानात मोबाईल देण्याचे बहाण्याने बोलावले होते. यावेळी मदतीला असलेल्या साथीदाराने दिव्याच्या मैत्रिणीस बोलण्यात व्यस्त ठेवले, तर आरोपी पतीने ब्लेडने दिव्याच्या गळ्यावर वार केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा पतीसह त्याचा मित्र, सासू आणि दोन नणदाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. पी. मुंढे यांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरील खटला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती आर.एन. पांढरे यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने मुख्य आरोपी पतीस दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच, एका महिन्याच्या आत पीडितेला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पुराव्याअभावी इतर चौघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक सुदाम सांगळे, महिला हवालदार रंजना गायकवाड, हवालदार सोमनाथ गावित, विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT