नाशिक

विवाहितेची आत्महत्या; आरोपी पतीला १० वर्षे सक्तमजुरी

CD
विवाहितेस आत्महत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी --- हुंड्यासाठी छळ; पुराव्याअभावी पाच संशयितांची निर्दोष मुक्तता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : हुंड्यापोटी १० लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच विवाहबाह्य संबंधांवरून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, पुराव्याअभावी पाच संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हेमंत संजय पगार-पाटील (वय ३०, रा. बलरामनगर, धात्रक फाटा, आडगाव शिवार, मूळ रा. उतरणे, ता. बागलाण) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑक्टोबर २०१८ ला ही घटना घडली होती. मृत सारिका हेमंत पगार हिने माहेरून हुंड्यापोटी १० लाख रुपये आणले नाहीत, या कारणावरून तिचा वेळोवेळी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच हेमंतचे इतर मुलींशी विवाहबाह्य संबंध असल्याने त्यावरूनही सारिकाला शिवीगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते. या प्रकरणी मृत सारिकाचा भाऊ केतन दौलत काकुळते (रा. किकवारी खुर्द, ता. बागलाण) यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक एस. ओ. सदाफुले यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात झाली. साक्षीदार, पंच आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने हेमंत पगार यास दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली; तर पाच संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक सुदाम सांगळे, अंमलदार महिला हवालदार रंजना गायकवाड आणि पैरवी अंमलदार संगीता बहिरम यांनी पाठपुरावा केला.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT