नाशिक

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप

CD
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप --- चारित्र्याच्या संशयातून व दारू न दिल्याच्या कारणावरून मारहाण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : धोंडेमाळ (ता. पेठ) येथे चारित्र्याच्या संशयातून, तसेच दारू न दिल्याच्या कारणावरून पत्नीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी बुधवारी (ता. ७) हा निकाल दिला. हिरामण भाऊराव गांगोडे (वय ५०, रा. धोंडेमाळ, ता. पेठ) असे आरोपीचे नाव असून, कुसुम गांगोडे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ ला मध्यरात्री घडली. कुसुम यांचे भाऊ हिरामण अमृता लोखंडे (रा. कसुली, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी हिरामण हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने पत्नी कुसुम यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याने दारूची मागणी केली. कुसुम यांनी दारू देण्यास नकार दिल्यावर त्याने घरातील कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना मारहाण केली. मुलगी गुणवंती हिने आईला वाचविण्यासाठी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिलाही मारहाण केल्याने ती भीतीपोटी मैत्रिणीच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर कुसुम या मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक के. एस. कपिले यांनी तपास करून आरोपीला अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड. रवींद्र निकम यांनी सहा साक्षीदार तपासले. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने हिरामण गांगोडे याला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात राठोड यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT