death esakal
नाशिक

Nashik News : मालेगावात डीके काॅर्नर भागातील दाम्पत्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील डीके काॅर्नर भागातील दाम्पत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. १०) रात्री हा प्रकार घडला. पंकज दिगंबर बिरारी (४०) व रेणुका पंकज बिरारी (३५, रा. डी. के. काॅर्नर) असे दाम्पत्याचे नाव आहे.

घटना घडली त्यावेळी घरात कोणी नसल्याने उशिरा हा प्रकार लक्षात आला. पंकज भाजपा चा धडाडीचा कार्यकर्ता होता. या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तथापि कर्जाला कंटाळून व कर्जदार खासगी कंपनीने तगादा लावल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. पंकज ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे बोलले जाते.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा व माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मृतदेह चिकित्सेसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT