नाशिक

पतीने पत्नीला घटस्फोटासाठी विहिरीत ढकलले

CD
घटस्फोटासाठी पत्नीला विहिरीत ढकलले --- पतीचे कृत्य : देवभाने शिवारातील घटना सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. १८ : वारंवार होणारे घरगुती वाद मिटवून नवीन गोडीगुलाबीने संसार करू, असे प्रेमाने सांगत पतीने पत्नीला देवभाने (ता. धुळे) येथे विहिरीत ढकलून देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विवाहितेचा पाय फ्रॅक्चर झाला असून, या प्रकरणी पतीविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका दिनेश महाले (वय ३०, सध्या रा. अशोकनगर, फाशीफुल, धुळे, मूळ रा. सोमेश्वर प्लॉट, सोनगीर) हिचा आणि पती दिनेश देविदास महाले यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून किरकोळ कारणावरून वाद होत असल्याने दीपिका माहेरी राहत होत्या. ७ ऑक्टोबरला दुपारी दिनेशने फोन करून, चूक झाल्याचे सांगत नव्याने संसार फुलवू, असे गोड बोलून पत्नीला धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ बोलावून घेतले. तिने मुलांबाबत विचारणा केली असता, मुले देवभाने येथे मित्राकडे आहेत. त्यांना भेटायला चल, असे सांगून दुचाकीने त्याने तिला देवभाने शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनलगत असलेल्या महादेव मंदिराकडे नेले. तिथे पोहोचल्यानंतर त्याने माफी मागण्याच्या बहाणा केला व तिला ठार करण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले. त्यात तिच्या उजव्या पायाला विहिरीचा कोपरा लागून तो फ्रॅक्चर झाला. विहिरीत पडल्यानंतर जिवाच्या आकांताने तिने विहिरीतील पाईप पकडून ठेवला. पतीने घटस्फोटाच्या कागदावर सही केली तरच बाहेर काढेन नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, ती जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले. तिला विहिरीबाहेर काढले. तिचा भाचा जिग्नेश अरुण निकम याच्यासोबत धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी (ता. १७) दीपिकानेे दिलेल्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात पती दिनेश देविदास महाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

Devendra Fadnavis: पक्षांतर्गत सत्ताबदलात अपयश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtrachi Hasyajatra : कष्टाच्या पैशातून घेतला महागडा फोन अन् सुरू झाली टीका; गौरव मोरेच्या त्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मने

Chhatrapati Sambhajinagar: बिडकीन, शिवराईतील शीतगृहांवर FDAचा छापा; ४.१९ कोटींचा अन्नसाठा जप्त, दोन्ही संस्थांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT