On the way to Wakhari, the winding road in front of the Panchmukhi temple is covered with thorn bushes. esakal
नाशिक

Nashik News : Hybrid Annuity रस्त्याचे काम थंडावले; कौळाणे- नांदगाव- येवला मार्गावरून खडतर प्रवास!

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : बहुचर्चित कौळाणे- नांदगाव- येवला हायब्रिड अन्युईटी रस्त्याचे नांदगाव- येवला टप्प्यातील काम कोरोनाकाळ संपल्यावर देखील गतिमान होऊ शकलेले नाही. काही ठिकाणी डांबरीकरण झाले असले तरी काही ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात हात आखडता घेण्यात आल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पीय आराखड्याच्या अहवालात दिसणाऱ्या रुंदीच्या प्रत्यक्ष कामात अंतर पडल्याने रस्ता कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. (Hybrid Annuity road work stopped Tough journey from Kaulane Nandgaon Yeola route Nashik News)

मालेगाव तालुक्यातील कौळाणे- नगावपासून नांदगावमार्गे येवलापर्यंतच्या ७२ किमीच्या अंतरावर येणाऱ्या गावागावातून जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करीत असताना नांदगाव- बाणगाव आदी ठिकाणचे काँक्रीटीकरण मात्र पूर्ण झालेले नाही. २०१७ मध्ये मंजूर रस्त्याच्या कामाला कोरोना संपल्यावर प्रारंभ करताना उशीर झाला होता. त्यानंतरही ते सुरळीत व लवकर सुरु होईना म्हणून तक्रारी वाढल्या होत्या.

संबंधित मक्तेदाराविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई केली व कामाला काही प्रमाणात गती मिळाली. शिवाय काम करणाऱ्या मक्तेदार कंपनीला मधल्या काळात मुदतवाढ देण्यात आली. १२ मीटर रुंदीच्या कौळाणे- नांदगाव- येवला हायब्रिड अन्युईटी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती आली.

हायब्रिड अन्युईटी अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १२० कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळून देखील होणारा विलंब वादाचा मुद्दा ठरला होता. शिवाय नांदगाव- येवला ४० किलोमीटर रस्त्याच्या कामाची मुदत फेब्रुवारी २०२१ ला संपुष्टा आली असताना बांधकाम कंपनीला पुन्हा ६ महिन्याची मुदत वाढवून मिळाली. सदर रस्त्याची रुंदी १२ मीटर आहे. पुलाच्या ठिकाणी अरुंद ९ मीटर रस्ता आहे.

काम सुरू असलेल्या भागात दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक लावणे अपेक्षित असताना अजूनही ते लागलेले नाहीत. कौळणे फाटा- नांदगाव- येवला रस्त्यावर एकूण १२१ मोऱ्या (छोटे पूल) आहेत. रस्ता रुंदीकरण कामासोबतच अंदाजपत्रकापैकी त्यातील किती पुलांचे रुंदीकरण झाले, हे तपासून घ्यावे लागणार आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सर्वात महत्वाचे म्हणजे या कामावर येवला येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे सनियंत्रण असून, या कार्यालयाकडे सदर रस्ता कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केल्यावर काम प्रगतिपथावर असल्याचे साचेबंद उत्तर देण्याकडे कल दिसून येत असतो.

वाहनचालकांची तारांबळ

एकूणच या कामाची प्रगती धीम्या पद्धतीची असताना पुढे काम सुरु, त्यामागे रस्ता खराब अशी अवस्था नाग्या- साक्या परिसरात दिसून येते. या रस्त्यावरील पांझण नदीवर पूल जुना असून, त्याला कठडे नाहीत. त्यापुढे पंचमुखी मंदिरापर्यंत काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून काढताना बाभळीची झुडुपे थेट रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे वाहन चालविणाऱ्यांना ते टाळून वाहने चालवावी लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT