नाशिक

दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना हवी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

CD
पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर -------------------------- कसमादेत उपाययोजनांची गरज सकाळ वृत्तसेवा झोडगे, ता. २७ : यंदा राज्यात दुष्काळाचा झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना व पशुपालकांना अवकाळा आली असून पशुधन कसे जगवावे या विवंचनेत माळमाथा परीसरातील शेतकरी दिसून येतो. कमी पाऊस अन् दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय करुन आपल्या उदरनिर्वाह करताना दिसतो.मात्र यंदाची दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून खरीपाच्या हंगामात पशुधनासाठी लागणारा चारा उपलब्ध नसुन पुढील काळात पाणी साठा उपलब्ध नसल्याने रब्बीच्या काळातील चारा उत्पादन होणार नाही . अशा वेळी पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तात्काळ आधुनिक ''हायड्रोपोनिक'' तंत्रज्ञानाचा वापर करून हिरव्या चाऱ्याची निर्मिती करण्याचे पशुपालकांना प्रशिक्षणाची गरज आहे. चौकट हायट्रोपोनिक तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत चारा तयार करण्यासाठी मातीची आवश्यकता नसते. विशिष्ट प्रकारच्या ट्रेमध्ये बियाण्यांची रुजवण करून नियंत्रित पाणीपुरवठा आणि योग्य वातावरणाच्या साहाय्याने हिरवा चारा तयार केला जातो. हायट्रोपोनिकचे ट्रेचे युनिट उभारले तर अल्प पाणी लागते. पशुधन, कोंबड्या आणि शेळ्यांना चारा मिळतो. माफक खर्चात चारा तयार होतो घरासमोरील अंगण किंवा लहान शेडमध्ये बहुमजली रॅक उभारून कमी जागेत मुबलक चारा पिकवता येतो.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT