Businessmen and customers present selling ice apple near the wall of the government rest house in front of the police drill ground in Malegaon esakal
नाशिक

Summer Fruit: कोकणातील तोडगोळे मालेगावात दाखल! प्रथमच फळ विक्रीसाठी आल्याने बघणाऱ्यांसह खरेदीदारांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Summer Fruit : शहरात तापमानाने पुन्हा डोके वर काढले आहे. तापमान वाढल्याने नागरिकांची शीतपेयांच्या गाड्यांवर झुंबड उडाली आहे. अशातच वाढत्या तापमानाच्या पाश्‍र्वभूमीवर कोकणातील तोडगोळे (आईस ॲपल) हे फळ विक्रीसाठी शहरात दाखल झाले आहे.

तोडगोळे हे फळ शरीराला थंड असल्याने मोठे लाभदायक आहे. शहरात हे फळ प्रथमच विक्रीसाठी आल्याने बघ्यांची व खरेदी करणाऱ्यांची गर्दी होत आहे. (ice apple from Konkan entered Malegaon Crowd of buyers summer fruit nashik news)

शहराचा पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. वाढत्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहाजवळील भिंतीलगत तोडगोळे विक्रीसाठी आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून तोडगोळे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

शहरात तोडगोळे हे फळ नवीन असल्याने नागरिकांना त्याची भुरळ पडली आहे. तोडगोळे १२० रुपये डझनप्रमाणे विकले जात आहेत. प्रामुख्याने तोडगोळ्यांचे अलिबाग, रत्नागिरी, पनवेल, पालघर, गोवा या कोकण भागात उत्पादन घेतले जाते.

कोकण पट्ट्यातील हे फळ एप्रिल महिन्यापासून बाजारात येण्यास सुरवात होते. जूनपर्यंत हे फळ बाजारात विक्रीसाठी दिसतात. प्रामुख्याने या फळांची विक्री मुंबई, केरळ येथे होते. शहरात विक्री होणाऱ्या तोडगोळ्यांना चांगल्या प्रकारे मागणी असून १० रुपये प्रतिनग प्रमाणे विकले जात आहेत.

तोडगोळे हे फळ मालेगावकरांना नवीन असल्याने व्यावसायिकांना ये-जा करणाऱ्या नागरिक विचारपूस करत फळाचे फायदे काय? व कोणत्या आजारासाठी या फळाचा उपयोग केला जातो. अशी विचारणा नागरिकांकडून व्यावसायिकांना केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तोडगोळे हे मधुमेहींसाठी गुणकारी

तोडगोळ्यांमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असते. या फळात विटॅमिन ए, सी यासह लोह, झिंक, कॅल्शिअम, फॉस्फरस आदी घटक आढळतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हे फळ फलदायी ठरते. तसेच उन्हाळ्यात तोडगोळ्यांचे सेवन केल्यामुळे पाण्याची कमतरता भरून निघते. शरीरातील तापमान नियंत्रित राहते. मुतखडा रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे अमीर खान यांनी सांगितले.

"तोडगोळ्यांची चवच इतर फळांपेक्षा वेगळी आहे. एका वेळेस खाल्ल्यास परत खाण्याची इच्छा होते. शहरातील नागरिकांनी फळांचा आस्वाद घ्यावा." - किशोर धात्रक

"गेल्या पाच वर्षापासून सीझनमध्ये आम्ही नाशिक शहरात तोडगोळे विकतो. मालेगावचे तापमान जास्त असल्याने या वर्षी थेट कोकणातून माल भरुन आणला आहे. महिनाभर मालेगावकरांना तोडगोळे विक्रीसाठी शहरात दिसणार आहेत."- अफझल पठाण, तोडगोळे विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT