पान-१- ॲंकर
IGT26B08764
कवडदरा (ता. इगतपुरी): परिसरात पावसाअभावी करपू लागलेले भाताचे पीक.
---------------
ऐन बहरात आलेले भाताचे पीक लागले करपू!
----------
महिन्यापासून पावसाची दडी : उत्पादन निम्म्यावर घटण्याची शक्यता, अर्थिक नियोजन कोलमडणार
----------
विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. ६ : इगतपुरी तालुक्यात खरिप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या पिकावर पावसाने दिलेल्या ओढीचा विपरित परिणाम झाला आहे. भाताचे पीक ऐन ओंबी धरण्याच्या अवस्थेत असल्याने नितांत गरज असताना पावसाने ताण दिल्याने आता परतीच्या पावसावर अपेक्षा आहे. त्यानेही हजेरी न लावल्यास भाताचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक आणि वर्षभराचे आर्थिक नियोजनच कोलमडणार आहे.
-----------------
तालुक्यातील २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्यात आली आहे. जूनमध्ये पाऊस झाला नाही, यामुळे भात पुनर्लागवड एक महिना उशिराने झाली. जुलै व आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडला. परंतु सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे दोन तीन दिवस वगळता महिनाभर पाऊस पडला नाही. परिणामी आता डोंगर उतारावरील ओढे नाले आटत आले आहेत. सध्या भातपिक ऐन बहरात असून भाताच्या लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहेत. भातासाठी आता पावसाची सर्वत्र आवश्यकता आहे. परंतु पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भात पीक डोळ्यासमोर करपत असल्याचे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर केलेले नियोजन कोलमडले आहे. भाताचे उत्पादन चांगले आले, तर शेतकरी भात अथवा तांदूळ विक्री करुन वर्षभराचे आर्थिक नियोजन करतात. परंतु आता पावसानेच दडी मारल्याने बारा महिने खायचे काय? असा प्रश्न बळीराजाला भेडसावत आहे.
-------------
तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ त्याचा उत्तम सुगंध व चव यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे.यावर्षी याच सुप्रसिद्ध इंद्रायणी तांदळावर संक्रांत येते की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे. आता येथून पुढे सर्वांचीच भिस्त परतीच्या पावसावर आहे. भात पीक सध्या ऐनबहराच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु पाऊस झालाच नाही तर पिक पूर्णपणे करपण्याची शक्यता आहे. तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत असला तरी पंचनामे करण्याची मागणी तमाम भात उत्पादक शेतकरी तसेच इतर राजकीय पक्ष, शेतकरी संघटना यांनी प्रशासनाला केली आहे.
------
कोट
भात पीक पावसाअभावी डोळ्यादेखत करपू लागले आहे. पाऊस न झाल्यास उभे भात पिक हातचे जाणार आहे.
- शांताराम शेलार, शेतकरी, त्रिंगलवाडी.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.