पान तीन मेन
---------------
08881
अडसरे बुद्रुक (ता.इगतपुरी) : भात शेतीत पडलेल्या भेगा.
इगतपुरीच्या पुर्व भागात भात पिके करपली
परिसरात तीव्र पाणी टंचाई; भाजीपाल्याच्या पिकांसह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१ : यंदाच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे इगतपुरीच्या पूर्व भागात बळीराजा पूर्णतः नेस्तनाबूत झाला आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे या भागातील भात शेती पूर्णपणे करपून गेली. मुख्य अन्नधान्य असलेले भात पीक पूर्णपणे हातातून गेल्याने उत्पादक संकटात सापडले आहे. गावागावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
अपुऱ्या पावसाचा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील जवळपास चाळीस वाड्या वस्त्या व जवळपास पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या असून बागायत शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भात शेतीत जमिनीला पूर्णपणे भेगा पडल्या असून नद्या नाले ओहळ पूर्णतः कोरडे ठाक पडले आहे. कूपनलिका, विहिरीतील पाण्यावर भात शेतीला काही शेतकरी कसेबसे पाणी भरत असून सुद्धा त्यात विजेचा सर्रासपणे लपंडाव चालू असल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.
-------
तीव्र पाणी टंचाई
पावसाअभावी स्थानिक जलस्रोत, विहिरी, कूपनलिका आणि धरणे चालू वर्षी ऑक्टोबरमधेच तळ गाठू लागली आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागणार आहे. शेती तर दूरच, पण साधे पिण्याचे पाणीही जर मिळेनासे झाले तर ग्रामीण भागात टँकरची मागणी देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
चाऱ्याची टंचाई :
शेतीसोबतच पूरक व्यवसाय असणाऱ्या दुग्ध व्यवसायालाही या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. चारा पिकांची लागवड न झाल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. पाणी आणि चाऱ्याअभावी शेतकरी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकण्यास हतबल झाले आहेत.
--------------------------------
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा :
शेतकऱ्यांना हेक्टरी ठोस आर्थिक मदत जाहीर करावी.
टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून पुढील हंगामासाठी तातडीने मदत द्यावी
पीक विम्याची रक्कम कोणतीही दिरंगाई न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.