नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरीच्या विविध भागात विजेचा वारंवार लपंडाव : नागरिक हैराण : शेतकरी बेजार ! वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणे बिघडण्याची भीती : कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी :

CD
इगतपुरीत सणासुदीत भारनियमन दुरुस्तीच्या नावाखाली तासन् तास फीडर बंद सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. ११ : तालुक्यातील पूर्व भागासह विविध भागांत व वाड्या-पाड्यात महावितरण उपविभागांतर्गत आठ दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे उपकरणांच्या बिघाडाचा धोका वाढला असून, आर्थिक नुकसान होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज बंद ठेवली जात असल्याने घरगुती कामांपासून ते व्यावसायिक व्यवहारांपर्यंत अनेक कामांवर परिणाम होत आहे. दुसरीकडे पावसाअभावी शेतीला पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वापर वाढला असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेचा लपंडाव होत असतानाही चुकीच्या बिलांच्या तक्रारीही होत आहेत. बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नाही. एखादे बिल थकीत राहिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तत्परतेने केली जाते. मात्र वीजचोरीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. पूर्व भागातील टाकेद, खेड, इंदोरे, बारशिंगवे, अधरवड, बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, धामणी, गोंदे, वाघेरे, माणिकखांब, मुंढेगाव परिसरातील नागरिकांच्या या प्रश्नांवर ग्रामपंचायतींसह स्थानिक लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, भरवीर, निनावी, भंडारवाडी, अडसरे बुद्रुक, मायदरा, धानोशी, ठोकळवाडी, टाकेद खुर्द, खेड, टाकेद बुद्रुक, अडसरे खुर्द, टाकेद, चौरेवाडी, बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, बारशिंगवे, वासाळी, अधरवड, इंदोरे, आंबेवाडी, मांजरगाव, परदेशवाडी, भरवज, निरपण, काळुस्ते, कांचनगाव, खैरगाव, देवळे, माणिकखांब, मुंढेगाव आदी गावांमध्ये विजेचा लंपजाव सुरू आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी ज्योती एक्स्प्रेस फीडर, बारशिंगवे फीडर, बेलगाव फीडर, परदेशवाडी फीडर, टाकेद फीडर, पिंपळगाव फीडर बंद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT