नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले रेशनकार्ड पुर्ववत करा : ऐन सणासुदीच्या तोंडावर रेशनकार्ड रद्द झाल्याने नागरिक संतप्त : मनसेचे आत्मराम मते यांच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन :

CD
फोटो : 08868 इगतपुरी : तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवदेन देताना मनसेचे शिष्टमंडळ. इगतपुरी तालुक्यातील रेशनकार्ड पूर्ववत करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. २७ : तालुक्यातील अनेक गावांत शासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता रेशनकार्ड रद्द केले आहे. ऐन सणासुदीत रेशनकार्ड रद्द झाल्याची माहिती ग्रामस्थांना रेशन दुकानदाराकडून मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आत्माराम मते, विक्रम पासलकर, गणेश मुसळे, अंकुश जाधव, वैभव दातीर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन दिले. रेशनकार्ड पूर्ववत न केल्यास उपोषणाचा इशारा दिला. या वेळी रद्द झालेले रेशनकार्ड पुन्हा सुरू करावे, शासनाच्या जाचक अटी रद्द कराव्यात तसेच कार्डधारकांचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर बंद केलेले कार्ड त्वरित सुरू करावे; अन्यथा सहकुटुंब तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला. तहसीलदार बारवकर यांनी काही दिवसांत आढावा बैठक घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संस्कार टिळे, काळू मते, राजाराम मते, विलास मुसळे, संदीप बऱ्हे, श्याम बरकले, गणेश जाधव, सौरभ मालुंजकर, बाळू धोंगडे, रवी पवार, गणेश पासलकर आदी उपस्थित होते. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आयोगाचं मोठं पाऊल; पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश

Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Scholarship Exam : इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार

Latest Marathi News Live Update : जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात सकल मराठा समाज संघटना आक्रमक

IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SCROLL FOR NEXT