नाशिक

इगतपुरी तालुक्यात ४ हजार ३०० शिधापत्रिका NPH मध्ये; आदिवासी बांधवांचेही धान्य बंद!

CD
पान दोन मेन ---------------------- इगतपुरीत हजारो शिधापत्रिकाधारक ‘प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात’ आदिवासी बांधवांचेही धान्य बंद; पुरवठा विभाग, सेतू कार्यालयात नागरिकांची झुंबड सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. २६ : इगतपुरी तालुक्यातील तब्बल ४ हजार ३०० शिधापत्रिका (एनपीएच) ‘प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झाल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांचे स्वस्त धान्य बंद झाले आहे. याचा फटका काही आदिवासी बांधवांनाही बसल्याने गरजू कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धान्याबाबत चौकशी करण्यासाठी आणि शिधापत्रिकेतील नोंदी दुरुस्त करून घेण्यासाठी नागरिकांची पुरवठा विभाग व सेतू कार्यालयात गर्दी होवू लागली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांच्या उत्पन्नाची, आयकर भरण्याच्या स्थितीची तसेच विविध पदांवरील कार्यरत व्यक्तींच्या पात्रतेची पडताळणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत काही शिधापत्रिकाधारक प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झाल्याने संबंधित कुटुंबांना मिळणारे धान्य बंद झाले आहे. मात्र, या कारवाईचा फटका काही आदिवासी बांधवांनाही बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब व आदिवासी कुटुंबांचे धान्य बंद झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हातावर पोट असलेल्या कुटुंबांना आता धान्य मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिधापत्रिका प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात का वर्ग झाली?, धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेण्यासाठी नागरिक पुरवठा विभाग आणि सेतू कार्यालयात गर्दी करत आहेत. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे कार्यालयीन कामकाजावरही ताण येत आहे. इगतपुरी तालुक्यातील या प्रश्नावर अन्न व नागरी विभाग, पुरवठा विभाग काय भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ----------- धान्याचा प्रश्न ऐरणीवर आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यात गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून मिळणारे धान्य हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे शिधापत्रिकांची पडताळणी करताना पात्र लाभार्थ्यांचे धान्य चुकीने बंद झाले नाही ना, याची प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झालेल्या शिधापत्रिकांची कारणे स्पष्ट करावीत, पात्र आदिवासी व गरीब कुटुंबांची तातडीने फेरतपासणी करावी आणि नियमानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. धान्य बंद होण्यामागे शासनाचे निकष असतील, मात्र इगतपुरी तालुक्यातील गरीब व आदिवासी कुटुंबांवर अन्याय होऊ नये. पात्रतेची फेरतपासणी करून खऱ्या गरजू कुटुंबांना धान्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करू. राजकीय पदे, आयकर भरणा, चारचाकी वाहने खरेदी, यावर शासनाने बंधने आहेत. - ललित पाटील, गुण नियंत्रण अधिकारी पुरवठा विभाग इगतपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT