पान-२ मेन
रेशनकार्डचे चित्र घेणे...
इगतपुरी तालुक्यात दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका बंद
सेतू कार्यालयात गर्दी; भूमिहीन बेरोजगार कुटुंबांचे हाल
------------------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. १ : तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांचे रेशनकार्ड बंदसंदर्भात कोणतीही अधिसूचना, नोटीस अथवा माहिती न देताच ऐन दुष्काळी परिस्थितीत दिवाळीच्या तोंडावर रेशनकार्ड धान्य एकाकीच बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात गावपातळीवर तत्काळ ग्रामसभा घेऊन या निर्णयाविरोधात संबंधित प्रशासन व यंत्रणांना त्वरित रेशनकार्ड सुरू करून दिवाळीत रेशन धान्य वितरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यात जवळपास चार हजार ३०० शिधापत्रिकाधारक ‘एनपीएच’मध्ये वर्ग झाले असून, याचा फटका ग्रामीण आदिवासीबहुल भागातील गोरगरीब भूमिहीन बेरोजगार कुटुंबांना बसला आहे.
आदिवासीबहुल भागातील कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणारे धान्य हाच उदरनिर्वाहाचा आधार होता. परंतु अचानक रेशन धान्य बंद केल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात अनेक कुटुंबाना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील भूमिहीन अल्पभूधारक, मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकने आयटी रिटर्न भरल्यास त्यांचेही कार्ड बंद झाले आहे. अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकामधील मृत व्यक्तीचे नाव कमी न केल्यामुळे कार्ड बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना संबंधित रेशन दुकानदार, पुरवठा अधिकारी व तहसीलदारांकडून फेरतपासणी करून निकष रद्द करून त्यांचे कार्ड तत्काळ सुरू करावे.
अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंबातील रेशनकार्ड बंद करण्याऐवजी कर भरणाऱ्या व्यक्तीचे रेशन बंद करावे, प्राधान्य, अंत्योदय, भूमिहीन, अल्पभूधारकांची यादी बनवावी, ग्रामीण भागातही रेशन धान्य स्मार्ट एटीएम सुविधा अमलात आणावी, रेशन दुकानदारांना नवीन बायोमेट्रीक टॅब मशिन द्यावे, रेशनकार्ड धारकांना रेशनकार्डऐवजी स्मार्ट एटीएम कार्ड द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
-------------------------
चौकट
यांचे रेशनकार्ड बंद
सहा लाखांपेक्षा ज्याचे उत्पन्न जास्त आहे, असे कार्डधारक, कर भरणारे ग्राहक, प्राधान्य कुटुंब, परंतु मृत व्यक्तींची नावे वगळल्याने रेशनकार्ड बंद, ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, चारचाकी वाहन आहे असे ग्राहक.
.......................
कोट
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. भूमिहीन तसेच व घरातील कोणालाही नोकरी नसल्याने रेशन धान्याचा आधार होता. तहसीलदारांनी गावपातळीवर गोरगरीब गरजू भूमिहीन कुटुंबाचे सर्वेक्षण करावे व त्यांचे रेशनकार्ड पूर्ववत करत ऑनलाइन धान्यासह सुरू करावे.
-नंदाबाई शिंदे, टाकेद बुद्रुक
---------------------------
कोट
ग्रामीण आदिवासी भागातील बेरोजगार, भूमिहीन कुटुंबांवर हा मोठा अन्याय झाला आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरावर पुन्हा सर्वेक्षण करून तत्काळ गोरगरिबांचे रेशन चालू करावे व दिवाळी गोड करावी.
- शमीम शेख, टाकेद बुद्रुक
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.