There is a ban on front sheet passenger transport from the city, but passenger transport is carried out in violation of traffic rules. These photographs were taken on the streets of the city esakal
नाशिक

Nashik News: फ्रंट शीट बेशिस्त रिक्षाचालकाकडे दुर्लक्ष! वाहतूक पोलिसांचा दुटप्पीपणा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात वाहतुकीच्या बेशिस्तीत रिक्षाचालक आघाडीवर असतात हे नवीन नाही. परंतु वाहतूक पोलिसही या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात उदासीन आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत मुजोर रिक्षाचालक फ्रंट शीट बसवितात आणि धोकादायकरीत्या प्रवाशांचाही जीव धोक्यात घालून प्रवास करतात.

मात्र, वाहतूक पोलिस बेशिस्त रिक्षाचालकाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात आणि विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना हेरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. यातून वाहतूक पोलिसांचा दुटप्पीपणा दिसून येतो. (Ignore front Seat unruly rickshaw Driver Duplicity of traffic police Nashik News)

नाशिक शहर आयुक्तालय हद्दीमध्ये रिक्षाचालकांना नियमानुसार तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन बेशिस्त रिक्षाचालकांकडून केले जाते.

असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यातून वाहतूक पोलिसांची उदासीनताच दिसून येते. याबाबत सर्वसामान्यांमध्ये मात्र नाराजी आहे.

सध्या टोइंग बंद असल्याने वाहतूक शाखेचे पोलिस सिग्नल्ससह महत्त्वाच्या पॉइंटवर नियुक्त असतात. त्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास इ- चलनाद्वारे कारवाई केली जाते.

मात्र यात वाहतूक पोलिसांचा दुजाभाव केला जात असल्याची टीका होत आहे. मुजोर रिक्षाचालक चौकांमध्ये बेशिस्तीने रिक्षा पार्किंग करतात. शहर बस थांब्याभोवती रिक्षांचाच गराडा असतो. त्यामुळे शहर बसला थांबायलाही अनेकदा जागा नसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एवढेच नव्हे तर, तीन प्रवासी वाहतुकीची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. अगदी फ्रंट शीट एक नव्हे दोन प्रवासी बसवून रिक्षाचालक धोकादायकरीत्या प्रवासी वाहतूक केली जाते.

मात्र अशा रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यातून अनेकदा अपघाताच्याही घटना घडलेल्या आहेत. परंतु तरीही रिक्षाचालक अत्यंत धोकादायकरीत्या फ्रंट शीट प्रवासी बसवून प्रवास करतानाचा रिक्षा सर्रास दिसतात.

प्रामुख्याने सिडको, सातपूर, पंचवटी, गंगापूर रोड, आणि नाशिक रोड या उपनगरांकडे चालणाऱ्या रिक्षांमध्ये फ्रंट शीट प्रवासी सर्रास वाहतूक केली जाते. मात्र, वाहतूक पोलिस याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात.

तर, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना हेरण्यासाठी सिग्नलपासून काही अंतरावर आडोशाला थांबून कारवाई केली जाते. अशीच कारवाई फ्रंट शीट रिक्षाचालकांविरुद्ध करावी, अशी मागणी सर्वसामान्य नाशिककर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT