alcohol.jpg 
नाशिक

दारु की मस्करी?...अवैध मद्य तस्करीचा चक्क 'महापूर'!

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेजारच्या राज्यातून मद्याची होणारी अवैध तस्करीची वाहतूक नाशिकच्या सीमावर्ती भागातून अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्याच्या गाडीपासून तर रुग्णवाहिका अन्‌ महागड्या गाड्यांचाही त्यासाठी वापर केला जातो. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दीड हजार जणांवर कारवाई करून सहा हजार लिटर देशी-विदेशी मद्य जप्त केले आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये वाहनांचे चालकच अटक झाले आहेत. त्यामुळे पथकाला मूळ तस्करांपर्यंत पोचता आलेले नाही. हे गौडबंगाल मात्र, वर्षानुवर्षांपासून कायम आहे. यामागे एक्‍साईज विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची कमतरतेचे कारण पुढे केले जाते. 

मद्याची महाराष्ट्र वा अन्य राज्यांमध्ये जवळपास दुप्पट किंमत

जिल्ह्याच्या सीमेलगत दादर-नगर-हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तेथे देशी-विदेशी मद्याचे उत्पादन करणाऱ्या काही कंपन्या आहेत. याठिकाणी शासकीय धोरण व करसवलतीमुळे मद्याच्या किमतीही महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी असतात. 
या मद्याची महाराष्ट्र वा अन्य राज्यांमध्ये जवळपास दुप्पट किंमत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी महाराष्ट्र व लगतच्या गुजरात राज्यात केली जाते. 
यासाठी नाशिकच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांचा राजरोसपणे वापर केला जात आहे.

एक हजार 252 वाहनचालक वा त्यांच्या साथीदारांना अटक

गेल्या वर्षभरामध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाने एक हजार 573 गुन्हे दाखल केले आहेत. अवैध मद्याची वाहतूक करताना एक हजार 252 वाहनचालक वा त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एक्‍साईज विभागाला गुन्ह्यातील मूळ तस्करांपर्यंत पोचता आलेले नाही. त्यामुळे सदरच्या कारवाया या फक्त मद्याच्या जप्तीपर्यंतच मर्यादित राहतात. 

विदेशी मद्याची तस्करी 

तस्करांच्या क्‍लृप्त्या भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या पिक-अपमध्ये पाठीमागे प्लॅस्टिकच्या क्रेट्‌समध्ये मद्याच्या बाटल्या आणि शेवटच्या काही क्रेट्‌समध्येच फक्त भाजीपाल्याचे क्रेट्‌स ठेवले जातात. जेणेकरून भाजीपाल्याचा पिक-अप असल्याचे भासविले जाते. दीड वर्षांपूर्वी अवैध मद्याची वाहतूक करताना रुग्णवाहिकाही एक्‍साईजने पकडली होती. 

मूळ तस्कर मात्र, मोकाट

गेल्या दोन महिन्यांत एक आयशर ट्रकच्या चेसीज व बॉडी यांच्या आतमध्ये लाखोंचा मद्यसाठा होता. गेल्या आठवड्यात सफारी कारच्या सीटखालील बॉडीत चोरकप्पे करून त्यातून विदेशी मद्याची तस्करी होत होती. मूळ तस्कर मात्र, मोकाट प्रत्येक गुन्ह्यात एक्‍साईजच्या हाती वाहनचालक लागतात. वाहनचालक जामिनावर सुटल्यानंतर तोही हाती लागत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

Sahyadri Tiger : ताडोबासारखे सह्याद्री व्याघ्र दर्शन कधी? जंगल सफारीची वाढती मागणी

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

भाडं मागायला आली मालकीण, भाडेकरू दाम्पत्यानं गळा दाबून संपवलं; सूटकेसमध्ये लपवला मृतदेह

SCROLL FOR NEXT