Illegal trades esakal
नाशिक

DPDC Meeting : डीपीडीसीच्या बैठकीत गाजले अवैध धंदे!; शहरातील अमली पदार्थ विक्रीवर खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, आज अखर्चित निधीवर चर्चा झाली, पण सोबतच सर्वाधिक चर्चा शहरातील अवैध धंद्यावर रंगली. शहर अमली पदार्थाच्या विळख्यात सापडले असून शहर पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत आमदारांनी कारवाईची मागणी केली. पालकमंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. (Illegal businesses popular in DPDC meeting discussion on drug sales in city Nashik News)

नियोजन भवनात झालेल्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी अमली पदार्थाच्या विक्रीच्या विळख्यात शहर सापडले आहे. अर्ज, निवेदन देऊनही पोलिसांकडून कारवाई होत नाही. महापालिकेच्या उद्यानात गांजा विक्री सुरू आहे. टपऱ्यांवर अमली पदार्थ मिळविण्यासाठी कोड आहेत. विशिष्ट कोड सांगितल्यानंतर खुलेआम अमली पदार्थ मिळतात. त्यातून गुन्हेगारी वाढली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त असून सामान्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा अशी मागणी केली. इतर आमदारांनी सुरात सूर मिसळत एका बाजूला ग्रामीण पोलिसांचा दरारा वाढत असताना शहरातील पोलिसांचा मात्र, गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याच्या तक्रारी केल्या.

११२ क्रमांकावर संपर्क साधा

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आमदारांच्या तक्रारीवर उत्तर देताना स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करता येणार नाही मात्र, आहे त्या ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या १५ मिनिटात शहर पोलिसांकडून प्रतिसाद मिळेल याची ग्वाही दिली. शहरात अमली पदार्थाच्या आणि महापालिकेच्या उद्यानातील गांजा विक्री प्रतिबंधासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहेत. त्यांच्या कारवाई सुरू झाली आहे. लवकरच त्याचा परिणाम दिसेल असा दावा केला.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

निकालाचा गैरअर्थ काढला

सारुळ येथील खाणीला प्रतिबंध केला असताना पुन्हा उत्खनन सुरू असल्यावर चौकशीची मागणी झाली. त्यात, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी न्यायालयीन आदेशानुसार कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यात, न्यायालयाच्या आदेशाचा गैरअर्थ लावून खाणपट्टेधारकांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप झाला. दिलीप बोरसे यांनी मात्र, ग्रामीण पोलिसांच्या कारवायांचे कौतुक करीत, ग्रामीण भागातील मोहीम अशाच सुरू ठेवण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील इतर आमदारांनी ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT