वन्यजीव अभयारण्यात गांजाची शेती उद्ध्वस्त
--------------------------------------
शिरपूरच्या जामन्यापाणी परिसरात संयुक्त कारवाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : शिरपूर तालुक्यातील जामन्यापाणी गावाजवळील वन्यजीव अभयारण्यात बेकायदा पद्धतीने करण्यात आलेली २.८७ हेक्टर (७.०८ एकर) क्षेत्रावरील गांजाची शेती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (सीबीएन) संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त केली. बुधवारी (ता.१४) करण्यात आलेल्या या कारवाईत दुर्गम व घनदाट जंगलातील पाच ठिकाणांवरील गांजाची पिके नष्ट करण्यात आली.
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार, जामन्यापाणी गावाजवळील वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत मोठ्या क्षेत्रावर गांजाची बेकायदा लागवड करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे डीआरआय आणि सीबीएनच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (ता.१४) अभयारण्य परिसरात कारवाई केली. शोधमोहिमेदरम्यान पाच वेगवेगळ्या भूखंडांवर गांजाची लागवड आढळून आली. एकूण २.८७ हेक्टर क्षेत्रावरील ही पिके यंत्राच्या साहाय्याने नष्ट करण्यात आली. घनदाट जंगल, दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वन्यप्राण्यांचा वावर आणि मोबाइल नेटवर्कचा अभाव यांमुळे ही मोहीम आव्हानात्मक ठरली. तरीही आवश्यक खबरदारी घेत अधिकाऱ्यांनी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोटाव्हेटरच्या साहाय्याने गांजाची पिके उद्ध्वस्त करण्यात आली.
या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बेकायदा अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात देशभरात अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्याचा निर्धार डीआरआय आणि सीबीएनने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.