नाशिक

पिंपळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १०० गॅस सिलेंडरसह पिकअप जप्त

CD
PML26B10237 पिंपळगाव बसवंत ः सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पोलिस निरीक्षक गणेश गुरव व कर्मचारी. ------------------- पिंपळगावला पीकअपसह १०० सिलिंडरसह जप्त --------------- ९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.९ ः घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या कारवाईत एचपी कंपनीचे १०० सिलबंद गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.८) पिंपळगाव पोलिसांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी सिद्धार्थनगर परिसरात सापळा रचून संशयित मुकुंद काशिनाथ नेर आणि दुर्गेश दिलीप शिंदे (दोघेही रा. शांतीनगर, सिडको, नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयितांकडून महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून प्रत्येकी १४.२ किलो वजनाचे एचपी कंपनीचे १०० सिलबंद घरगुती गॅस सिलिंडर वाहून नेले जात असल्याचे आढळले. या वाहतुकीसंदर्भात आवश्यक पावत्या, बिले आणि परवान्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी सिलिंडर आणि वाहन जप्त केले. १६-१ ९ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत ३ लाख ३४ हजार ६०० रुपये किमतीचे १०० गॅस सिलिंडर तसेच ६ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी अतुल अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गुरव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक रोहिदास भोर, अंमलदार विकास वाळुंज, योगेश देशमुख आणि नितीन गाढवे यांनी कारवाईत भाग घेतला. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT