Seized Stock esakal
नाशिक

Nashik Crime News : वणी बसस्थानकानजीक 12 लाख किंमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा ताब्यात!

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने सह दिवसांपूर्वी तालुक्यात वणी नाशिक रस्त्यावरील अक्राळे फाटा येथे वाहनातून सुमारे २२ लाखांचा मद्यसाठा जप्त केला असतांनाच वणी नाशिक या रस्त्यावरच वणी बसस्थानकानजीक अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथकाने कारवाई करीत सुमारे १२ लाख किंमतीचे विदेशी मद्य जप्त केला आहे. दरम्यान दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत राज्य सहा दिवसांच्या अंतराने दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असून मद्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे. (Illegal foreign liquor stock worth 12 lakhs seized near Vani Bus Stand Nashik Latest Crime News)

वणी - नाशिक रस्त्यावर बसस्थानकाजवळील हॉटेल वंदेश समोर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक कार्यालयाचे अधिपत्या खालील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे साफळा रचला होता. पथकास

मिळालेल्या माहीतीच्या वर्णनाचे संशयीत वाहन अशोक लेलंड कंपनीचे दोस्त आरआयएस मॉडेल असलेले चार चाकी माल वाहतूक वाहन क्रमांक एमएच-४८-ए वाय- २९३५ असलेल्या वाहानाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये १०० लिटर क्षमतेचे १२ प्लास्टीक ड्रम दिसून आले. त्याबाबत वाहन चालकास विचारणा केली असता त्याने त्या ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या एस. एल. ई. एस. (Sodium Lauryl Ether Sulphate) जेलची कागदपत्रे तपासणीसाठी सादर केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका- यांना संशय आल्याने त्यानी गाडीतील सर्व तपासणी केली. प्लास्टीक ड्रम सील तोडून झाकन उघडून पाहिले असता, त्यात प्रथमदर्शनी जेल दिसून आले. अधिक तपासणी केली असता, सदर जेलच्या स्तराखाली महाराष्ट्र राज्यात निर्मित दादरा व नगर हवेली व दमण-दिव येथे विक्री करीता (महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला) इम्पेरियल ब्लु व्हिस्की हा ब्रॅण्ड असलेल्या मद्याच्या सुटया बाटल्याचा साठा एकूण २४० सिलबंद बाटल्या २० मद्य साठा बॉक्स व १८० मिली क्षमतेच्या १९२० सिलबंद बाटल्या (४० बॉक्स), एक जीओ कंपनीचा मोबाईल व १२ प्लास्टीक ड्रम असा रु.११ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल आढळून आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

या गाडीचा चालक दिनानाथ सीताराम पाल, वय ४६ वर्षे, रा. रुम नं.०८ साईकृपा, ब्राम्हण गल्ली, उमेळमान, वसई, जि. पालघर याला ताब्यात घेण्यात आले असून चार संशयित फरार झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांचे मार्गदर्शना खाली कळवण विभागाचे निरीक्षक सुनील सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक, महेंद्र सोनार, कर्मचारी दिपक आव्हाड, एम.सी. सातपुते, व्ही.टी. कुवर, एस. डी. पोरजे, व वाहनचालक श्री. पी. एम. वाईकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण उपविभागीय हद्दीत मोठ्याप्रमाणात अवैध देशी विदेशी मद्य विक्री होत आहे. अनेक खेडोपाड्यात ही विक्री वाढली असुन त्याबाबत ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून राजरोस पणे वाहतुक करून अवैध विक्री केली जाते. बनावट विदेशी मद्याच्या बेकायदेशीर विक्रीमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूलामध्येही मोठया प्रमाणात नुकसान होते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस यंत्रना याकडे अर्थपूर्ण सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा संशय नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT