Gutkha seized esakal
नाशिक

Nashik Crime News : सिन्नरला लाखाचा 1.16 लाखांचा अवैध गुटखा जप्त!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : येथील बारागावपिंप्री रस्त्यावर विजयनगर भागात घर व किराणा दुकानावर सोमवारी (ता.९) जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून १ लाख १६ हजार ७२७ रुपयाचा गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला.

याप्रकरणी दीपक भास्कर घोरपडे (३६) यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली. (illegal Gutkha worth Rs 1 Lakh seized from Sinnar Nashik Crime News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विजयनगर भागात असलेल्या दीपक भास्कर घोरपडे यांच्या कृष्णा ट्रेडर्स या दुकानात व घरात गुटखा सुगंधी तंबाखू व पानमसाला यांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

त्याआधारे दुकान व घरात छापा टाकण्यात आला. पोलिस शिपाई सूरज कुमावत यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात संशयित दीपक घोरपडे यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT