Liquor seized
Liquor seized 
नाशिक

महामार्गावर ९४ लाखांची अवैध दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यातील बेकायदा मद्य वाहतुकीविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत गुरुवारी (ता.३) रात्री आणखी मोठे घबाड मिळविण्यात प्रशासनाला यश आले. नगर-मनमाड मार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दहाचाकी वाहनांतून तब्बल ९४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार बेकायदा वाहतूक होणाऱ्या वाहनांसह दारूसाठा जप्त करीत, या कारवाईत शहादा (जि. नंदुरबार) येथील दोन जणांना बेड्या ठोकल्या. संजय पाटील (३६) व काशीनाथ पाटील (४३, रा. सालदारनगर, जुना प्रकाशा रोड, शहादा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नगर-मनमाड मार्गावरून मोठ्या प्रमाणात मद्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.४) रात्री पिंपळगाव जलाल शिवारातील येवला टोल नाका भागात वाहन तपासणी सापळा लावण्यात आला. 

दहाचाकी ट्रकमधून वाहतूक 

भरधाव दहाचाकी ट्रक (एमएच ०४ डीएस २९२८) अडवून तपासणी केली असता हा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. ट्रकच्या चालक व क्लिनरला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने गाडीतील ब्ल्यू क्रेशर, ब्लॅक पॅशन, रॉयल रायडर व्हाइट मॅजिक, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, इंपेरिअल ब्ल्यू, रॉयल रायडर रेअर ओक, रॉयल डबल, इंपेरिअल वॅट नं. १ आदी प्रकारच्या विदेशी मद्याने भरलेली खोकी अशा वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मद्यवागतुकीचा भांडाफोड होणार

संशयितांच्या अटकेने बेकायदा मद्यवाहतुकीचा भांडाफोड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. पथकाचे निरीक्षक ऋषीकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, निरीक्षक डी. एन. पोटे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. येवला, मालेगाव, सटाणा, कोपरगाव व नाशिकच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. विभागीय पथकाचे निरीक्षक आर. एम. फुलझळके अधिक तपास करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार- चित्रा वाघ

SCROLL FOR NEXT