नाशिक

घात - अपघात

CD
मालेगावला अवैध वाळूचा ट्रॅक्ट्रर जप्त मालेगाव : येथील आंबेडकर नगर ते एकात्मता चौक या रस्त्यावर अशोक सिताराम कुवर (वय ३०, रा. द्याने) हा अवैध गौणखनिजाची वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून साडेतीन लाखाचा ट्रॅक्टर व ३ हजार ८०० रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा ३ लाख ५८ हजाराचा ऐवज जप्त केला. मंडल अधिकारी पंढरीनाथ खैरनार यांच्या तक्रारीवरुन कॅम्प पोलिस ठाण्यात अशोकविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ------- पवारवाडी भागात तरुणास मारहाण मालेगाव : येथील पवारवाडीतील तुटी बोरिंगजवळ लहान मुलांच्या भांडणावरुन तरुणास मारहाण करण्याचा प्रकार घडला. मोहम्मद सुफियान मोहम्मद रमजान (वय २३) याच्या आई फरिदा बानो यांच्याशी रफिक, अकीब, शाकीब, रईस (पुर्ण नाव माहित नाही, सर्व रा. पवारवाडी तुटी बोरींगजवळ) हे भांडण करीत होते. मोहम्मद याने तुम्ही भांडण करु नका असे समजावून सांगितले. याचा राग आल्याने अकीबने शिवीगाळ करुन मोहम्मद सुफियानवर धारदार हत्याराने उजव्या हाताच्या पंजावर वार करुन हाताला दुखापत केली. मोहम्मदचा भाऊ कासीम हा भांडण सोडवत असतांना रफिक, शाकीब, रईस यांनी लाकडी काठीने मारुन दुखापत केली. तुम्ही जर आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवानिशी संपवून टाकू अशी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. रोशनबाद येथे दुचाकी लंपास मालेगाव : येथील रोशनाबाद भागातील अब्दुल अजिज शेख रज्जाक (वय ५२) यांची ३० हजाराची दुचाकी (एमएच ४१ एडब्ल्यु ३९३७) चोरट्यांनी चोरुन नेली. रोशनाबादनगर येथील घरासमोरुन चोरट्यांनी दुचाकी लांबवली. आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Gokul Election Controversy : गोकुळच्या निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी? बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो!; के. पी. पाटलांच्या विधानाने खळबळ

राखी सावंतच्या अडचणीत वाढ; १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, अभिनेत्रीमुळे गेलेला एकाचा जीव

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS अधिकारी होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे रोखठोक बोलले, पण नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कामगाराचा मृत्यू

Dussehra Traditions: भारताच्या 'या' भागात विजयादशमीला जाळत नाही रावण; उलट जावई आणि महाविद्वान मानून केली जाते पूजा!

SCROLL FOR NEXT