Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS अधिकारी होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे रोखठोक बोलले, पण नेमकं कारण काय?

Career Advice : करिअर निवडताना प्रत्येकाने स्वतः कोणती समाजाची समस्या सोडवू शकतो आणि समाजात कसे मूल्यवर्धन करू शकतो, याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. निर्णय इतरांचे अनुकरण न करता स्वतःच्या क्षमता, कौशल्य आणि आवडीनुसार घेण्याचा सल्ला दिला.
Tukaram Mundhe’s Career Advice to Students

Tukaram Mundhe’s Career Advice to Students

esakal

Updated on: 

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’ कार्यक्रमात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना करिअर निवडण्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला. ‘आयएएस अधिकारी व्हावं की यशस्वी उद्योजक व्हावं?’ असा प्रश्न एका तरुणाने विचारला असता, मुंढे यांनी स्वतःची क्षमता, कौशल्य आणि आवड ओळखून करिअरची निवड करण्याचे आवाहन केले. तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, दुग्ध व्यवसायातील संधी आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपायांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com