नाशिक

सारुळमध्ये बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यावर गुन्हा

CD
३६-३ सारुळमध्ये उत्खनन करणाऱ्यावर गुन्हा ----------- तहसील प्रशासनाची कारवाई : संशयिताला ठोठावला दंड ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२७ : जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश देऊनही प्रत्यक्षात खाणपट्टा सुरु ठेवत सुमारे २० ब्रास अवैध दगड उत्खनन केल्याप्रकरणी सारुळ (ता. जि. नाशिक) येथील एका खाणपट्टाधारकाविरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास गणपत नवले (रा. सारुळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात नाशिक तहसील प्रशासनाने संबंधित संशयितास दंडही ठोठावला आहे. मौजे सारुळ शिवारातील गट क्रमांक १४८ मधील दगडखाण आणि खडीक्रेशर प्लॉंट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यापूर्वीच निलंबित व बंद करण्यात आले आहेत. पिंपळदचे ग्राममहसूल अधिकारी अरुण फसाळे आणि महिरावणी मंडळाचे सहकाऱ्यांचे पथक सारुळ शिवारात खाणपट्टे तपासणीसाठी गेले असता या गटात विनापरवाना दगडाचे उत्खनन सुरु असल्याचे व अंदाजे २० ब्रास दगड काढून ठेवल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन आदेश असतानाही संशयित कैलास नवले यांनी प्रशासकीय आदेशाला न जुमानता आपल्या मालकीच्या खाणपट्ट्यात विनापरवाना व बेकायदेशीरपणे दगड उत्खनन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महसूल पथकाने तातडीने वाडीवऱ्हे पोलिसांना पाचारण करत जागेवर पंचनामा केला. सुमारे १२ हजार रुपये किमतीचा उत्खनन केलेला मुद्देमाल व प्रकार नोंदवून घेतला. या प्रकरणी ग्राममहसूल अधिकारी फसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्या दाखल केला आहे. तहसील प्रशासनाने संशयित नवलेंना अवैध उत्खनन प्रकरणी दंड ठोठावला आहे. शासननियमानुसार २० ब्रासचे बाजारमूल्य आणि बाजारमूल्याच्या पाचपट दंडाची रक्कम असून एकुण २ लाख १७ हजार ७५० दंडाची रक्कम आहे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT