नाशिक

वड, पिंपळ झाडांची शहरात बेकायदा तोड

CD
३३०८२ नाशिक : जनावरांना खाऊ घालण्यासाठी पिंपळ, वड, औदुंबरच्या फांद्या बेकायदेशीरपणे तोडून वाहतूक करणारे टेम्पो. ------------- वड, पिंपळाच्या फांद्याची शहरात बेकायदा तोड; महापालिकेचे दुर्लक्ष सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : शहरात वृक्षतोडीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जनावरांना खाऊ घालण्यासाठी पिंपळ, वड, औदुंबर यांच्या फांद्या बेकायदेशीरपणे तोडून त्याचा पाला विक्री केला जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच शहरातील मांस विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये या पाल्याचा साठा आढळला. माहिती मिळताच कारवाई करण्यात आली असून फांद्या आणि पाल्याने भरलेले दोन टेम्पो जागेवरच पकडून थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकाराकडे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. शहरात राजरोसपणे वृक्षतोड सुरू असताना पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सदरचा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते सुरेश निकुंभ यांना संबंधित व्यावसायिकांशी संघर्ष करावा लागला. कारवाईच्या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यावसायिक जमा होऊन त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या कारवाईत दोन टेम्पो ताब्यात घेण्यात आले आणि नंतर तो सर्व मुद्देमाल सुरक्षितपणे पांजरपोळ येथे पोहोचवण्यात आला. या कामी पांजरपोळचे अधिकारी सागर आडके यांनी सहकार्य केले. महापालिका उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

SCROLL FOR NEXT