नाशिक

देवघटच्या पाझर तलावातून अवैध पाणी उपसा थांबणार: लघुपाटबंधारे महावितरणला पत्र

CD
पान तीन --------------------- देवघटच्या पाझर तलावातील अवैध पाणी उपसा थांबणार -------- लघुपाटबंधारे उपविभागाचे महावितरणला पत्र सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता.६: माळमाथा भागातील देवघट (ता. मालेगाव) येथील पाझर तलावातून विद्युत मोटारींच्या साहाय्याने सुरू अवैध व बेकायदेशीर पाणी उपसा सुरू आहे. सदर उपशसावर तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाने वीज वितरण कंपनीला उपायोजना करण्याची सुचना केली आहे. यासंदर्भात उपअभियंत्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र पाठवून पाझर तलाव परिसरातील बेकायदेशीर वीजजोडण्या तातडीने खंडित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य प्रशांत देसले यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार अर्ज दाखल करत देवघट येथील सार्वजनिक जलसाठ्यातून (पाझर तलाव) काही व्यक्ती अनधिकृतपणे विद्युत मोटारी लावून पाण्याचा उपसा करत असल्याचे नमूद केले होते. या पार्श्‍वभूमीवर महावितरण विभागाने पाझर तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. अवैध पाणी उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी व संबंधित वीजजोडण्यांवर कारवाई करून त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. श्री.देसले यांनी केलेल्या तक्रारीची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे उपविभागाच्या उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाला पत्र पाठवले असून कारवाईचे निर्देश दिले आहेत. पाझर तलावातील पाणीसाठा हा परिसरातील भूजल पुनर्भरण, विहिरींची पाणी पातळी वाढवणे व स्थानिक नागरिकांची पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तलावातून असाच अनधिकृत उपसा सुरू राहिल्यास उपलब्ध साठा झपाट्याने कमी होऊन येत्या काळात शेतकरी व ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल याकडे संबंधितांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT