Citizens rush to buy sugarcane juice esakal
नाशिक

Sugarcane Juice : शहरात 300 टन उसाची आयात! उसाच्या गुऱ्हाळावर नागरिकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Sugarcane Juice : ऊन चांगलेच तापू लागल्याने कासावीस झालेल्या नागरिकांना उसाच्या रसाची भुरळ पडत आहे. उन्हात काहीसा आधार म्हणून नागरिक उसाच्या गुऱ्हाळाची वाट धरत गर्दी करत आहे.

दैनंदिन व्यवसायात हजारोंची उलाढाल होत आहे. यामुळे शहरात सुमारे दोनशे ते तीनशे टन उसाची आयात होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (Import of 300 tons of sugarcane in city Crowd of citizens on sugarcane juice summer season nashik news)

उन्हाळा लागताच शहरभरात विविध ठिकाणी रसाचे गुऱ्हाळ थाटले जातात. हाफ ग्लास १५, फूल २० तर जम्बो ग्लास २५ रुपये विक्री होत आहे. यंदा पाच रुपयांनी प्रतिग्लास वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षात प्रथमच रसाच्या दरात वाढ झाली आहे.

शहरात सुमारे साडेचारशे ते पाचशे रसाचे गुऱ्हाळ तर सव्वाशे ते दीडशे फिरते गुऱ्हाळाच्या माध्यमातून रस विक्री होत आहे. मार्च ते मे तीन महिन्यात सुमारे ६० टक्के व्यवसायात वाढ होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. यंदा वर्षभर अवकाळी पाऊस पडला आहे.

शेतातील ऊस मोठ्या प्रमाणावर झोपला आहे, तर काही ऊस लालसर होऊन खराब झाला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. बांडी ४ हजार ३०० रुपये टन तर ऊस ६ हजार ५०० रुपये टन विक्री होत आहे.

बांडी आणि उसाच्या दरांमध्ये सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, वीजबिल, व्यवसायासाठी लागणारी विविध प्रकारचे साहित्य यांच्या दरांमधील वाढीचा परिणामही दरवाढीवर झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आरोग्यदायी उसाचा रस

* यकृतासाठी गुणकारी : कावीळ झालेल्या रुग्णांना उसाचा रस आवर्जून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यकृताचे विकार त्यासंदर्भातील अन्य आजार दूर होण्यास मदत होते.

*रोगप्रतिकारशक्ती वाढ : रोगप्रतिकारशक्ती काळाची गरज आहे. त्यात उसाचा रस महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विषाणूजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

* वजन घटण्यास मदत : कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. वजन कमी होत असते. थकवा जाणवत नाही.

* ऊर्जा वाढीस: उसाच्या रसामुळे शरीरातील ऊर्जा वाढत असते. तजेलदार वाटत असते. शरीर विशेषतः चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात.

*हाडांच्या विकारावर गुणकारी : उसाच्या रसामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण मुबलक असते. असे सर्व घटक हाडांसाठी आरोग्यवर्धक ठरतात.

"कुठल्याही प्रकारचे रासायनिक मिश्रण नसून नैसर्गिक रस असल्याने नागरिकांचा उसाच्या रसाकडे ओढ अधिक असतो. आरोग्य पोषक ठरतो. विशेष म्हणजे ताजा रस सेवन करण्यास मिळत असतो." - हेमंत जगताप, रस विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT