Malegaon: Cantonment police taking Vasudev Shirke, the mastermind of the land buying and selling fraud gang, to the court. esakal
नाशिक

Land Purchase Sale Case : जमीन खरेदी-विक्री प्रकरणी दलालास अटक; 2 वर्षांनी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील विविध भागातील शेतजमीन, भूखंड विक्री करणाऱ्यांना हेरून त्यांच्याशी बाजार भावाने सौदा करत ऐन वेळी खरेदीचे शासकीय दराप्रमाणे दस्तऐवज बनवून फक्त शासकीय दराची रक्कम देऊन उर्वरित लाखो रुपये हडप करणाऱ्या दलाल टोळीतील मुख्य सूत्रधाराला छावणी पोलिसांनी शनिवारी (ता.२१) दुपारी अटक केली.

शहरातील अनेक दलालांनी संगनमत करून गरजू व भोळ्याभाबड्यांना फसवणूक करण्याच्या या प्रकाराचा सुळसुळाट झाला होता. गेल्या दोन वर्षात हे प्रकार वाढले होते. आज न्यायालयीन आदेशावरून गुन्हा दाखल झाला. यात आठ ते दहा जणांची सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपयांना फसवणूक झाली आहे. (In case of land purchase sale main broker was arrested by cantonment police malegaon news)

या प्रकरणी अर्चना जर्नादन अहिरे (रा. लेबरमन सोसायटी, साई चौक, बालेवाडी पुणे) यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून श्रीमती अहिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी वासुदेव प्रकाश शिर्के (वय ३८, रा. मुक्ताई कॉलनी, भायगांव शिवार), कुंदन कृष्णा बोरसे (रा. जीवन विहार अपार्टमेंट, सटाणा नाका), संदीप सोमनाथ हिरे (रा. कॅम्प), जितेंद्र बाबूराव कास (रा. भायगाव रोड, जाजुवाडी, चौघे मालेगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य सूत्रधार वासुदेव शिर्के याला अटक झाली आहे.

कुंदन व संदीप यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. जितेंद्र कास हा चौथा संशयित फरार आहे. यात फसवणूक झालेल्या अन्य संशयितांच्या गुन्ह्यात आणखी काही दलाल व मातब्बरांचा समावेश आहे. अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, उपनिरीक्षक सुनील अहिरे, शांतिलाल जगताप, नितीन बाराहाते यांनी शिर्केला अटक केली.

श्रीमती. अहिरे यांच्या मालकीचे येथील प्लॉट नं. १११/२/३/४/३५ व १११/२/३/४/३६ या मिळकतीचा ६८ लाखाचा व्यवहार ठरला होता. यात संशयितांनी ९ लाख ३८ हजार रुपये अदा केले होते. त्यानंतर संशयित यांनी श्रीमती अहिरे यांचा विश्वास संपादन करून प्लॉट मिळकतीचे खरेदी खताचा दस्त बनवून व्यवहारात ठरविण्यात आलेली उर्वरित रक्कम ५८ लाख ६२ हजार रुपयांचा डीडी देतो असे सांगितले. प्रत्यक्षात खरेदी झाल्यानंतर संशयित फरार झाले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

एकाच पद्धतीचा वारंवार वापर

अहिरेंना संशयितांनी यांनी ज्या पद्धतीने फसविले. तीच पद्धत त्यांनी इतर लोकांविरुद्धही वापरली. यात लोकेश निकुंभ यांना द्यानेतील यंत्रमाग कारखाना विक्री प्रकरणी, तात्याभाऊ देवरे यांना शेतजमीन विक्री प्रकरणी तर मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बशीर यांना जमीन बदला देतो असे सांगून त्यांच्याकडून जमीन खरेदी करून घेतली.

प्रत्यक्षात दुसरी जमीन खरेदी करून दिलीच नाही. याच पद्धतीने दहा ते पंधरा जणांची फसवणूक केल्याचे तक्रारदारांनी सांगितले. यापूर्वी फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात अनेकवेळा तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित ऐन वेळी फक्त शासकीय दराचे दस्तऐवज तयार करून बाजारभाव ऐवजी ऐन वेळी केलेल्या दस्तऐवजातील नमूद रक्कमच देवून फसवणूक करीत होते असे निदर्शनास आले आहे.

"जमीन विक्रीची निकड असलेल्या गरजवंतांना ओळखून त्यांच्याशी बाजारभावाप्रमाणे सौदा करावयाचा. विक्रेत्याला दाखविण्यासाठी तसा दस्त तयार करावयाचा, त्यानंतर विविध कारणे सांगून फसवणूक करण्याचा या टोळीचा धंदा तेजीत होता. आठ ते दहा जणांची सुमारे दहा ते पंधरा कोटींना फसवणूक झाली आहे." - संदीप पाटील, भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT