Fraud
Fraud esakal
नाशिक

भाडेकरुने गाळा परस्पर केला नावावर; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सतीश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर परिसरात सहा वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दिलेला गाळा भाडेकरूने बिल्डरकडून परस्पर नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाळा मालकाने याबाबत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर कॉलनीतील नाना धोंडू कोठावदे यांनी पिंपळगाव बहुला शिवारातील ब्ल्यू डायमंड अपार्टमेंटमधील १२. ८० चौरस मीटरचा गाळा कोशी जॉर्ज कुरुविल्ला (५१, रा. कॅनडा कॉर्नर) यांच्याकडून २०१५ ला विकत घेतला होता. सदर गाळा कोठावदे यांनी राहुल भगवान मुसळे (३५, रा. चामुंडा पार्क, अशोकनगर) यांना पाच- सहा वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दिला होता. दरम्यान, गाळा नावावर करण्यासाठी कोठावदे यांनी बिल्डरकडे तगादा लावला होता. परंतु, बिल्डरकडून टाळाटाळ केली जात होती. गाळा मालकाने सातबारा उतारा घेतला असता, भाडेकरू असलेल्या राहुल मुसळे यांनी सदर गाळा योगिता राहुल मुसळे (३३, रा. अशोकनगर) यांच्या नावावर परस्पर करून घेतल्याचे उघडकीस आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाना कोठावदे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी भाऊराव केरू पवार (५३, रा. नाशिक रोड), कोशी जॉर्ज कुरुविल्ला (५१, रा. कॅनडा कॉर्नर), योगिता राहुल मुसळे, राहुल भगवान मुसळे (३५, रा. सातपूर), अक्षय दशरथ भोर (४८), सचिन दगूजी निकम (३४, रा. फुलेनगर पेठ रोड), देवराम भाऊराव संसारे (६०) आदींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT